मुंबई - काैशल्य विकासासाठी राज्यात २३०० कोटी रुपये खर्च करून विविध योजना आणि उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यासाठी जागतिक बँकेशी करार करण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी पत्र परिषदेत दिली.
आगामी शंभर दिवसांत कौशल्य विकास विभाग काय करणार, याबाबतची माहिती देताना लोढा यांनी सांगितले की, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून ५० हजार युवक-युवतींना प्रशिक्षण दिले जाईल. मुंबईबरोबरच नागपूर, पुणे, नाशिक, अमरावतीसह छत्रपती संभाजीगर येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल केंद्र कार्यरत होणार आहे. कौशल्य विकास विभाग व उच्च तंत्रशिक्षण विभाग नोकरी देणाऱ्या संस्थाबाबत सर्वसमावेशक असा एकत्रित कायदा करण्यात येणार आहे.
आयटीआयच्या कौशल्य विकास केंद्रामार्फत १ लाख १० हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आयटीआय, तसेच व्यवसाय शिक्षण संचालनालयाच्या परीक्षा ऑनलाइन करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.