हरिप्रसाद चौरसिया यांना मंगेशकर पुरस्कार; पं. शिवकुमार शर्मा यांना भीमसेन जोशी जीवनगौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 07:37 AM2022-06-01T07:37:55+5:302022-06-01T07:38:08+5:30

सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा;

Mangeshkar Award to Chaurasia; Bhimsen Joshi Lifetime Achievement to Shivkumar Sharma | हरिप्रसाद चौरसिया यांना मंगेशकर पुरस्कार; पं. शिवकुमार शर्मा यांना भीमसेन जोशी जीवनगौरव

हरिप्रसाद चौरसिया यांना मंगेशकर पुरस्कार; पं. शिवकुमार शर्मा यांना भीमसेन जोशी जीवनगौरव

googlenewsNext

मुंबई : संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करण्यासाठी दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पं. हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर झाला आहे, तर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार हा दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांना जाहीर झाला आहे. 

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी राज्य सरकारच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा केली. 
विविध पुरस्कार घोषित करतानाच आगामी काळात चित्रपट, नाटक, संगीत यांच्या समीक्षणासाठीही पुरस्कार सुरू करण्याचा शासनाचा मानस असल्याचे मंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कलावंतांना जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे 

नाटक -  कुमार सोहोनी (सन २०१९-२०); गंगाराम गवाणकर (सन २०२०-२१) 
कंठसंगीत- पंडितकुमार 
सुरूसे (सन २०१९-२०); कल्याणजी गायकवाड (सन २०२०-२१) 
उपशास्त्रीय संगीत - शौनक अभिषेकी (सन २०१९-२०); देवकी पंडित (सन २०२०-२१)
वाद्यसंगीत - सुभाष खरोटे (२०१९-२०); ओमकार गुलवडी (सन २०२०-२१)
मराठी चित्रपट - मधु कांबीकर (सन २०१९-२०); वसंत इंगळे (सन २०२०-२१) 
कीर्तन/समाजप्रबोधन- ज्ञानेश्वर वाबळे (सन २०१९-२०); गुरूबाबा औसेकर (सन २०२०-२१) 
तमाशा - शिवाजी थोरात (सन २०१९-२०); सुरेश काळे  (सन २०२०-२१) 
शाहिरी - शाहीर अवधूत विभूते (सन २०१९-२०);
दिवंगत शाहीर कृष्णकांत जाधव (सन २०२०-२१) 
नृत्य - शुभदा वराडकर
(सन २०१९-२०); जयश्री राजगोपालन (सन २०२०-२१) 
लोककला - सरला नांदुलेकर (सन २०१९-२०); कमलबाई शिंदे (सन २०२०-२१) 
आदिवासी गिरीजन क्षेत्रासाठी- मोहन मेश्राम (सन २०१९-२०); गणपत मसगे (सन २०२०-२१) 
कलादान- अन्वर कुरेशी 
(सन २०१९-२०); 
देवेंद्र दोडके (सन २०२०-२१).
लोककला क्षेत्रासाठीचा विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार - आतांबर शिरढोणकर (सन २०१९-२०); संध्या माने (सन २०२१-२२)
नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या नावे दिला जाणारा रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार - दत्ता भगत (सन २०२०-२१); सतीष आळेकर (२०२१-२२)

या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. सर्व पुरस्कार लवकरच या  पुरस्कारार्थींना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.

Web Title: Mangeshkar Award to Chaurasia; Bhimsen Joshi Lifetime Achievement to Shivkumar Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई