लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लावणी कलावंत महासंघाच्या वतीने नुकतेच लावणी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील लोककलेच्या क्षेत्रातील मुख्यत्वे तमाशामधील विशेष योगदानाबद्दल लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील लोककलेच्या क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल लोककलेचे अभ्यासक, लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांना गौरविण्यात येईल. महाराष्ट्रातील लोककलेच्या क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल तसेच तमाशा आणि वगनाट्याच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करणारे सोंगाड्या लोकशाहीर सुधाकर पोटे नारायणगावकर यांनाही यंदा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, लोककलेच्या क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल तसेच शहिरी परंपरा जपणाऱ्या महिला शाहीर केशर जैनु शेख, लोककलेच्या क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल नामवंत ढोलकी वादक बापू मोरे, लोककलेच्या क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल नामवंत हार्मोनियम वादक शहाजी जाधव यांना आणि लोककलेच्या क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल जेष्ठ लावणी नृत्यांगना प्रियांका शेट्टी यांना यंदाचे लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष संतोष लिंबोरे यांनी दिली. या पुरस्कारांचे वितरण १६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता परळ येथील दामोदर सभागृहात होणार आहे.
लावणीसम्राज्ञी मंगला बनसोडे यांना पुरस्कार
By admin | Published: May 09, 2017 1:48 AM