आविष्कार देसाई ल्ल अलिबाग
वातावरणातील सततच्या बदलामुळे आणि नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्यातील सात अब्ज 5क् कोटी रुपयांचे आंबा पीक धोक्यात आले आहे. या अस्मानी संकटाने आंबा बागायतदार चांगलाच अडचणीत आला आहे. सरकारकडून मदत मिळण्यासाठी आंबा बागायतदारांच्या संघटनांनी आतापासूनच त्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत.
रायगड जिल्ह्यात सुमारे 12 हजार हेक्टर क्षेत्रवर आंब्याचे पीक घेतले जाते. थंडीच्या मोसमातच आंब्याला चांगल्या प्रकारे मोहोर येतो मात्र यंदा थंडीला उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मोहोर येण्यास प्रारंभ झाला होता. जिल्ह्यात हवामानात सातत्याने बदल होत असतानाच शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने वादळी वा:यासह प्रचंड थैमान घातले. त्यामुळे आंब्याला आलेला मोहोर पुरता गळून पडला आहे. आता नव्याने आंब्याला मोहोर येण्यासाठी पुन्हा त्यांना बेभरवशाच्या हवामानावर अवलंबून राहावे लागणार आहे.
गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 18.63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक 84.6 मिलीमीटर पाऊस पडला असून, त्या खालोखाल अलिबागमध्ये 58.क्क् मिलीमीटर, श्रीवर्धन 47.क्क् मिलीमीटर, पेणमध्ये 4क्.क्4 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात कमी पावसाची नोंद मुरुड तालुक्यात झाली आहे. महाड आणि पोलादपूरमध्ये शून्य मिलीमीटर पाऊस पडला आहे. या पावसामुळे आंब्याच्या मोहोरावर तुडतुडय़ा रोग तसेच बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम प्रत्येक तालुका पातळीवर करण्यात येत असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
च्1 हेक्टर क्षेत्रमध्ये 1क्क् आंब्याची झाडे असतात. 1 झाड सरासरी 25क् आंब्यांचे उत्पादन देते. रायगड जिल्ह्यात आंब्याचे 12 हजार हेक्टर क्षेत्र आहे. 12 हजार हेक्टरमध्ये 12 लाख आंब्याची झाडे.
च्12 लाख झाडांना 3क् कोटी आंबे, 3क् कोटी आंब्यांचा हिशोब डझनाप्रमाणो केल्यास तो दोन कोटी 5क् लाख डझन असा होतो.
च्एक डझन आंबे सरासरी 3क्क् रुपये प्रति डझन, त्याप्रमाणो दोन कोटी 5क् लाख डझनांचा हिशोब केल्यास तो सात अब्ज 5क् कोटी असा होतो.
खालापूरमध्ये वीट उत्पादकांचे मोठे नुकसान
खालापूर : तालुक्याला शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने झोडपून काढले. मध्यरात्री मेघगर्जनेसह कोसळलेल्या पावसाने वीट उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे. गेली 2 वर्षे वीटभट्टीचा व्यवसाय संकटात असून, विटेला मागणीच नसल्याने आधीच संकटात असलेल्या वीट व्यावसायिकांवर अवेळी आलेल्या पावसाने मोठे संकट कोसळले आहे. तालुक्यातील वीट व्यावसायिकांचे काही कोटींचे नुकसान या पावसाने केल्याचा अंदाज आहे.
खालापूर तालुक्याला शुक्रवारी मध्यरात्री मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. शुक्रवारी संध्याकाळपासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता होती. रात्री उशिरा विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या पावसाने तालुक्यातील वीट उत्पादकांचे काही कोटींचे नुकसान केले आहे. खालापूर तालुक्यात वीट व्यवसाय मोठय़ा प्रमाणात केला जातो. बँका व खाजगी ठिकाणाहून पैसे उभे करून अनेक तरुण या व्यवसायात उभे राहण्याचा प्रय} करीत आहेत, मात्र अशा प्रकारे संकटे येत असल्याने अनेकांसमोर घेतलेले पैसे परत कसे करायचे, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
खालापूर तालुक्यात दिवाळीनंतर वीट कारखाने सुरू होतात. शुक्रवारी अवकाळी पाऊस पडल्याने तयार करण्यात आलेल्या विटांचे मोठे नुकसान झाले आहे. वीट उत्पादकांचे यामुळे झालेले नुकसान काही कोटींच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेली दोन वष्रे या व्यवसायावर मंदीचे सावट आहे. त्यातूनही अनेक जण या व्यवसायात तग धरून आहेत. अनेक वीट व्यावसायिकांचे यात कंबरडेच मोडले. दरम्यान, नुकसान झालेल्या वीट उत्पादकांना शासनाने नुकसार भरपाई द्यावी, अशी मागणी वीट उत्पादक अभिजित पाटील यांनी केली आहे.
रेवदंडा : शुक्रवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदार आणि वीटभट्टी कारखानदारांना याचा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मागील दोन दिवस ढगाळ हवामान असताना उष्म्यात वाढ झाल्याने थंडी गायब झाली होती. रात्री काही वेळ पावसाने शिडकावा केल्यानंतर विजांचा लखलखाट सुरू होऊन पावसाने चांगलाच जोर धरला. त्यात विद्युतपुरवठा खंडित झाला. रेवदंडा बाजारपेठेतील रस्ता चिखलमय झाल्याने पादचा:यांना तारेवरची कसरत करावी लागली. दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकारही परिसरात घडले.
नागोठणो : मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान शहरासह परिसरात गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतातील भातमळण्या भिजल्या असून, त्यातील भाताचे दाणो काही अंशी भिजले आहेत. काही शेतांमध्ये नागोठण्याचा प्रसिद्ध म्हणून ओळख असलेल्या वालाचे पीक फुलले असतानाच या पावसामुळे उगवलेली फुले गळून जायची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वालाचे पीकही धोक्यात येऊ शकते, असे एका शेतक:याने सांगितले. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे.