Join us

अंधेरीत श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन उत्साहात साजरा

By मनोहर कुंभेजकर | Published: April 10, 2024 7:31 PM

अंधेरी पश्चिम येथील श्री स्वामी समर्थ मठात आज मोठ्या उत्साहात पार पडला.

मुंबई: श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन मुंबईतीलअंधेरी पश्चिम येथील श्री स्वामी समर्थ मठात आज मोठ्या उत्साहात पार पडला. प्रकट दिनाला अनुसरुन रुद्दाभिषेक, समर्थ चरित्र पठण व इतर विधींचे आयोजन करण्यात आले होते.श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या वेळी श्री स्वामी समर्थांचा संदेश देणारी आकर्षक रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.

श्री स्वामी समर्थां मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट (सोलापूर) नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके 1778, अनल नाम संवत्सरे,रविवार ( 06/04/1856) हा होता. तेव्हां पासून स्वामींचा प्रकट दिन गुढी पाडव्याच्या दुस-या दिवशी राज्यभर साजरा केला जातो.

अंधेरीतील श्री स्वामी समर्थ मठ, कै. कमलाकरपंत वालावलकर यांनी स्थापन केला होता. 1996 पासून येथे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन दरवर्षी साजरा केला जातो, अशी माहिती महेश नाटेकर यांनी दिली. 

अंधेरी येथील श्री स्वामी समर्थ नगर ही मोठी वसाहत कै कमलाकरपंत वालावलकर यांनीच ऐंशीच्या दशकांत उभारुन मध्यम वर्गीयांना अत्यंत कमी दरात घरे उपलब्ध करुन दिली होती अशी माहिती जेष्ठ पत्रकार राजू वेर्णेकर यांनी दिली.

टॅग्स :मुंबईअंधेरी