Join us  

शेअर्समध्ये हेराफेरी : नागपूरच्या व्यावसायिकांना २० कोटींचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 2:46 PM

जुहू पोलिसांनी जस्मीन शहा, दीपिका जस्मीन शहा आणि विशाल शहाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तिघेही विलेपार्ले येथील रहिवासी आहे.

मुंबई : शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवून देण्याच्या नावाखाली नागपूरच्या व्यावसायिकासह त्याच्या दोन मित्रांना २० कोटी ९० लाखांना गंडविल्याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका कंपनीच्या तीन संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू पोलिसांनी जस्मीन शहा, दीपिका जस्मीन शहा आणि विशाल शहाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तिघेही विलेपार्ले येथील रहिवासी आहे. मूळचे नागपूरचे रहिवासी असलेले तक्रारदार अभिनव रमाकांत फतेहपुरीया (४०) यांची मे. सिल्व्हरस्टोन इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनी आहे. त्यांच्या कंपनीतर्फे ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट केली जाते. अभिनव यांच्या कंपनीला तसेच त्यांचे मित्र राहुल आणि राजकुमार अगरवाल यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची होती.

त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडून त्यांनी विलेपार्ले येथील जे. एन. एमरियाल्टी या शेअर ट्रेडिंग एजन्सीचे संचालक जस्मीन शाह यांच्याशी संपर्क साधला. शाह यांनी चांगली गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार तिघांनी २० कोटी ९० लाख रुपये शहा यांच्या खात्यावर वर्ग केले.त्यांनतर शहा यांनी ७५ लाख ५० हजार शेअर्स २१ कोटी ३२ लाख ८७ हजार ५०० रुपयांना विकत घेतल्याचा व्हॉट्सॲप मेसेज केला. काही दिवसांनी अभिनव यांना त्यांच्या शेअर्स रजिस्टरमध्ये समजले की, शहा यांनी कंपनीचे शेअर्स हे त्यांना न विचारता टप्प्याटप्प्याने विकले. 

टॅग्स :धोकेबाजीशेअर बाजारगुंतवणूक