मनीष त्रिपाठीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, डाॅ. त्रिपाठीचं आज आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 06:43 AM2021-06-29T06:43:43+5:302021-06-29T06:44:20+5:30

हिरानंदानी सोसायटी बनावट लसीकरण

Manish Tripathi's pre-arrest bail application rejected | मनीष त्रिपाठीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, डाॅ. त्रिपाठीचं आज आत्मसमर्पण

मनीष त्रिपाठीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, डाॅ. त्रिपाठीचं आज आत्मसमर्पण

googlenewsNext

मुंबई : कांदिवली येथील हिरानंदानी सोसायटी बनावट लसीकरणप्रकरणी आरोपी असलेला डॉक्टर मनिष त्रिपाठी याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज सोमवारी दिंडोशी सत्रन्यायालयाने फेटाळला. हिरानंदानी सोसायटीने तक्रारीत असे म्हटले आहे की, काही लोकांनी, एका खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी आहोत, असे सांगून सोसायटीत लसीकरण मोहीम राबवली. ती लस कदाचित बनावट असू शकते.

डॉ. त्रिपाठीने आपल्या अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले होते की, यातील मुख्य आरोपी शिवम रुग्णालय आहे. मुंबई पोलीस राजकीय लोकांशी संबंध असलेल्या ताकदवान रुग्णालय मालकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. आरोपीने पोलीस तपासाला पूर्ण सहकार्य केले आहे. १५ जून रोजीच आरोपीने पोलिसांना जबाब दिला आहे, असे आरोपीने अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले होते. मात्र, दिंडोशी सत्रन्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. 

डाॅ. त्रिपाठी आज करणार आत्मसमर्पण
वकील ॲड. आदिल खत्री यांनी डॉ. त्रिपाठीच्यावतीने आत्मसमर्पण अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. ‘माझे अशील डॉ. त्रिपाठी हे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास दंडाधिकारी अथवा परिमंडळ अकराचे पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयात आत्मसमर्पण करणार आहेत, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Manish Tripathi's pre-arrest bail application rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.