मनीषा म्हैसकर यांची बदली; कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर महापालिकांना मिळाले नवे आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 06:40 PM2020-02-13T18:40:46+5:302020-02-13T19:22:33+5:30
राज्यातील प्रशासनामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठे फेरबदल करण्यात आले असून, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुंबई - राज्यातील प्रशासनामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारीपदावर बदली करण्यात आली आहे. तर सध्या सध्या रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत असलेले डॉ.व्ही.एन सूर्यवंशी यांची केडीएमसीच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सी.के. डांगे यांची नियुक्ती मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर करण्यात आली आहे.
आज राज्य सरकारकडून बदल्या करण्यात आलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे
- नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव यांची नियुक्ती मनीषा पाटणकर म्हैसकर प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारीपदावर करण्यात आली
- महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जयश्री भोज यांची नियुक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदावर करण्यात आली आहे.
- रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत असलेले डॉ.व्ही.एन सूर्यवंशी यांची केडीएमसीच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
- अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव एम डी पाठक यांची नगर विकास- २ विभागाच्या प्रधान सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे , मुख्य कार्यकारी अधिकारी डी एम मुगळीकर यांची नियुक्ती परभणीच्या जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली
- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांची नियुक्ती आयुक्त पशुसंवर्धन पुणे या पदावर करण्यात आली
- सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सी.के. डांगे यांची नियुक्ती मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर करण्यात आली आहे.
- लातूर महानगरपालिकेचे आयुक्त एम देवेन्द्र सिंह यांची नियुक्ती यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे.