श्रीकांत जाधव / मुंबई : गृहिणीमध्ये दडलेल्या गुणांना कौशल्य प्रशिक्षणाची जोड देत त्यांनी निर्माण केलेल्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी वल्लभ नारी विकास संस्थेने स्व:खर्चाने येत्या २७ आणि २८ जानेवारी रोजी ' मंजिले - २४ ' या महिला कला उत्सवाचे परेल येथे आयोजन केले आहे. त्यामुळे वल्लभच्या १० हजार महिलांसोबत इतरही महिलांना हक्काची बाजारपेठ मिळणार आहे.
जैन महिलांच्या विकासासाठी प्रथम ५ महिलांना सोबत घेत 'वल्लभ नारी विकास संस्था ' स्थापन करणाऱ्या अंजना कोठारी, गुणवंती राका, पूनम छाजेड, हेमलता जैन, वीणा पालरेचा, रेखा सोलंकी यांनी बुधवारी पत्रकार संघात संस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माध्यमांना माहिती दिली. महिला बाजारपेठ म्हणून ' मंजिले - २४ ' या उत्सवाचे येत्या २७ आणि २८ जानेवारी रोजी सेंट्रल रेल्वे मैदान, परेल येथे आयोजन करण्यात आल्याचेही वल्लभच्या अध्यक्षा कोठारी यांनी जाहीर केले.
कोविड काळात उच्च कुटुंबात गृहिणी म्हणून आलेले कडूगोड अनुभवातून उभारी घेत वल्लभ नारी विकास संस्थेने जैन आणि इतर महिलांसाठी ' मंजिले - २४ ' च्या माध्यमातून मुक्त बाजारपेठ उपलब्ध केली आहे. सध्या संस्थेने जैन व्यापारी वर्गातील तसेच गरीब कुटुंबातील अशा जवळपास १० हजार महिलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम केले आहे. त्यामुळे या महिला घर, कुटुंब सांभाळून केवळ कौशल्य गुणांवर पैसा आणि प्रतिष्ठा मिळवत आहेत. महिलांना संधी म्हणून ' मंजिले - २४ ' या उत्सवाचे येत्या २७ आणि २८ जानेवारी रोजी सेंट्रल रेल्वे मैदान, परेल येथे आयोजन करण्यात आल्याचे वल्लभ नारी विकास संस्था अध्यक्ष अंजना कोठारी यांनी सांगितले.