मनरेगातील घोटाळा आघाडीच्या काळातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:15 AM2018-05-18T05:15:22+5:302018-05-18T05:15:22+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी येथे सन २०११ - १२ मध्ये मनरेगाअंतर्गत वन विभागाच्या विविध कामात अनियमितता तथा अपहार झाल्याचे निदर्शनास आले
मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी येथे सन २०११ - १२ मध्ये मनरेगाअंतर्गत वन विभागाच्या विविध कामात अनियमितता तथा अपहार झाल्याचे निदर्शनास आले असून त्यातील दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जात असल्याचे रोजगार हमी विभागाने आज स्पष्ट केले.
या प्रकरणी अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याची अमरावती विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करण्यात आली. आयुक्तांनी चौकशी पूर्ण करुन त्याचा अहवाल शासनास सादर केला. शासनामार्फत या अहवालाची छाननी करुन जबाबदार अधिकारी, कर्मचाºयांविरुद्ध कडक कारवाई प्रस्तावित करण्यात आली. त्यानुसार कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी रोहयो विभागाच्या सचिवांनी क्षेत्रीय स्तरावर व्यक्तिश: भेट देऊन आणि संबंधित अधिकाºयांची बैठक घेऊन कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असल्याचेही विभागाने कळविले आहे. या योजनेत कोणत्याही प्रकारचा अपहार तथा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही. दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले.