मुंबई : मानखुर्द येथील जयहिंदनगर, सोनापूर, ज्योतिर्लिंगनगर, आंबेडकरनगर, जनकल्याण सोसायटी, पी. एम. जी. पी. कॉलनी परिसरात शनिवारी आणि रविवारी वीजपुरवठा खंडित झाला होता. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा सुमारे २३ तासांनी रविवारी दुपारी १२ वाजता सुरळीत झाला. रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर रिलायन्स एनर्जीच्या ग्राहकसेवा अधिकाºयाने सांगितले की, तांत्रिक अडचणींमुळे वीजपुरवठा शनिवारी सुरळीत करता येणार नाही. रविवारी सकाळी वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल. मात्र, रविवारी दुपारी १२ नंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला.
मानखुर्दमध्ये २३ तास अंधार, शनिवारी आणि रविवारी वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 6:24 AM