Manohar Joshi Health Update: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी त्यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मनोहर जोशी यांच्या तब्येती संदर्भात विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे सकाळी हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर आता रूग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे.
पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईच्या वतीने मीडिया स्टेटमेंट जारी करण्यात आले. 'महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, यांना P.D. हिंदुजा येथे दाखल करण्यात आले आहे. 22 मे रोजी सेमीकोमाच्या आपत्कालीन स्थितीत त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना दाखल करण्यात आले त्यावेळीपासून ते स्वतःहून श्वास घेत आहे, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले नाही. त्यांना ब्रेन ट्यूमर झाल्याने उपचारादरम्यान काहीशी गुंतागुंत आहे. ते सध्या आयसीयूमध्ये असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्यांना उपचारांची गरज असल्याने वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे', अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटत असल्याने सोमवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. १९९५-९९ मध्ये राज्यातील पहिल्या शिवसेना-भाजप सरकारमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.