'मनोहर जोशी अद्यापही ICU मध्येच'; 'ब्रेन हॅमरेज'बद्दल हिंदुजा रूग्णालयाने दिली अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 05:21 PM2023-05-24T17:21:35+5:302023-05-24T17:22:56+5:30

Manohar Joshi Health Update: मनोहर जोशी यांना ब्रेन ट्युमर झाला आहे. त्यांच्यावर हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

manohar joshi health update is critical and semi-comatose His brain haemorrhage is stable He continues to be in ICU  | 'मनोहर जोशी अद्यापही ICU मध्येच'; 'ब्रेन हॅमरेज'बद्दल हिंदुजा रूग्णालयाने दिली अपडेट

'मनोहर जोशी अद्यापही ICU मध्येच'; 'ब्रेन हॅमरेज'बद्दल हिंदुजा रूग्णालयाने दिली अपडेट

googlenewsNext

Manohar Joshi Health Update: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. २२ मे रोजी त्यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. बुधवारी, २४ मे रोजी हिंदुजा रूग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी करत मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.

श्री मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना P.D हिंदुजा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. 22 मे रोजी आपत्कालीन परिस्थितीत, सेमीकोमामध्ये त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना अद्यापही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले नाही, ते स्वतःहून श्वास घेत आहेत. मनोहर जोशी यांची प्रकृती काहीशी चिंताजनक आहे. त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला असला तरी आता ते स्थिर आहेत. ते अजूनही आयसीयूमध्ये आहेत. त्यांच्यावर वैद्यकीयदृष्ट्या देखरेख ठेवली जात आहे आणि त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, असे हिंदुजा रूग्णालयाकडून सांगण्यात आले.

मंगळवारी रात्रीदेखील एक मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आले होते. पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईच्या वतीने मीडिया स्टेटमेंट जारी करण्यात आले. 'महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, यांना P.D. हिंदुजा येथे दाखल करण्यात आले आहे. 22 मे रोजी सेमीकोमाच्या आपत्कालीन स्थितीत त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना दाखल करण्यात आले त्यावेळीपासून ते स्वतःहून श्वास घेत आहे, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले नाही. त्यांना ब्रेन ट्यूमर झाल्याने उपचारादरम्यान काहीशी गुंतागुंत आहे. ते सध्या आयसीयूमध्ये असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्यांना उपचारांची गरज असल्याने वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे', अशी माहिती त्यात देण्यात आली होती.

दरम्यान, मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटत असल्याने सोमवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. १९९५-९९ मध्ये राज्यातील पहिल्या शिवसेना-भाजप सरकारमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनोहर जोशी यांच्या तब्येती संदर्भात विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे मंगळवारी सकाळी हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले होते.

Web Title: manohar joshi health update is critical and semi-comatose His brain haemorrhage is stable He continues to be in ICU 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.