Join us

अंतरवाली सराटी ते नवी मुंबई, असा चालला मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 8:06 AM

Maratha Reservation: अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू झाले होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे-पाटील यांच्या नेतृत्त्वात भगवे वादळ अखेर मुंबईत धडकले. अखेर २७ जानेवारी रोजी सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.

अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू झाले होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे-पाटील यांच्या नेतृत्त्वात भगवे वादळ अखेर मुंबईत धडकले. अखेर २७ जानेवारी रोजी सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.वर्ष २०२३- २९ ऑगस्ट : अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू झाले.१ सप्टेंबर : उपोषण सोडण्यासाठी बळाचा वापर झाला. पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक जण जखमी झाले. त्यानंतर राज्याचे लक्ष मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे लागले. राजकीय नेत्यांचे अंतरवालीत दौरे सुरू.  २ सप्टेंबर : मराठवाड्यात अनेक ठिकाणी जिल्हा बंदची घोषणा झाली. काही ठिकाणी बस जाळण्यासह इतर हिंसक प्रतिक्रिया उमटल्या. ८ सप्टेंबर : उपोषणाला बसलेले जरांगे-पाटील यांच्या शिष्टमंडळाने रात्री मुंबईत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.  १० सप्टेंबर : सरकारला दिलेला चार दिवसांचा अल्टिमेटम् संपल्याने जरांगे पाटील यांनी पाणी त्यागले, सलाईनही बंद केली. १४ सप्टेंबर : १७ दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडले. सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला. राज्यभरातील साखळी उपोषण सुरूच ठेवले.  जरांगे यांच्या सभांना ठिकठिकाणी सुरुवात झाली.  २५ ऑक्टोंबर : दिलेल्या मुदतीत मागण्या पुर्ण न झाल्याने जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाला सुरूवात केली. नेत्यांना अनेक गावांमध्ये प्रवेशास बंदी. ३० ऑक्टोंबर : बीड, माजलगावमध्ये लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ला, जाळपोळ, धाराशिव आणि परभणीमध्येही हिंसक वळण. ०२ नोव्हेंबर :  मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी मान्य करत ९ दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण जरांगे-पाटील यांनी स्थगित केले.   ३ नोव्हेंबर  : कुणबी नोंदी शोधण्याची मोहिम राज्यभर राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागिय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश.  १५ नोव्हेंबर : राज्यात मनोज जरांगे-पाटील यांचा संपर्क दौरा. २३ डिसेंबर : २० जानेवारीपासून मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषण करणार अशी बीडच्या इशारा सभेतून घोषणा. वर्ष २०२४ २० जानेवारी : अंतरवाली सराटी येथून जरांगे यांच्या नेतृत्त्वात समाजबांधवांचे मुंबईच्या दिशेने प्रस्थान. २६ जानेवारी : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे-पाटील यांच्या नेतृत्त्वात भगवे वादळ अखेर मुंबईत धडकले.

टॅग्स :मराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटील