मनोरा आमदार निवासातील घोटाळे भोवर्ले; कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळगे निलंबित

By यदू जोशी | Published: April 1, 2018 06:10 AM2018-04-01T06:10:08+5:302018-04-01T06:10:08+5:30

मंत्रालयासमोरील मनोरा आमदार निवासात खोल्यांची कामे न करताच, ३ कोटी ७६ लाखांची बिले कंत्राटदारांना दिल्या प्रकरणी, राज्य सरकारने अखेर कार्यकारी अभियंता (प्रेसिडन्सी) प्रज्ञा वाळके यांना शनिवारी निलंबित केले आहे. ‘घोटाळ्यांचे मनोरे’ ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले होते.

Manora MLA lodges scandal; Executive Engineer Pragya Vikas suspended | मनोरा आमदार निवासातील घोटाळे भोवर्ले; कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळगे निलंबित

मनोरा आमदार निवासातील घोटाळे भोवर्ले; कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळगे निलंबित

Next

मुंबई : मंत्रालयासमोरील मनोरा आमदार निवासात खोल्यांची कामे न करताच, ३ कोटी ७६ लाखांची बिले कंत्राटदारांना दिल्या प्रकरणी, राज्य सरकारने अखेर कार्यकारी अभियंता (प्रेसिडन्सी) प्रज्ञा वाळके यांना शनिवारी निलंबित केले आहे. ‘घोटाळ्यांचे मनोरे’ ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले होते.
आमदारांच्या ३३ खोल्यांच्या कामाच्या या घोळाबद्दल भाजपाचे तुमसर (जि. भंडारा) येथील आमदार चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २७ जुलै २०१७ रोजी तक्रार केली होती.

आधी बदली, नंतर पुन्हा चौकशी
या प्रकरणी अधीक्षक अभियंता अरविंद सूर्यवंशी (सार्वजनिक बांधकाम मंडळ, मुंबई) यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवाल ५ आॅगस्ट रोजी विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग यांना दिला. त्यानंतर, उपअभियंता भूषणकुमार फेगडे आणि शाखा अभियंता केशव धोंडगे यांना निलंबित करण्यात आले. वाळके यांची केवळ नवी मुंबईला बदली करण्यात आली.
त्यानंतर, बांधकाम विभागाच्या दक्षता पथकाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांनी पुन्हा चौकशी केली. त्यांनी सरकारला दिलेल्या अहवालात वाळके यांच्याही निलंबनाची शिफारस करण्यात आली होती. त्याआधारे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांच्या शिफारशीनुसार, वाळके यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Web Title: Manora MLA lodges scandal; Executive Engineer Pragya Vikas suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Manoraमानोरा