- गणेश देशमुखमुंबई : १९९५ साली तत्कालीन युती सरकारच्या काळात बांधण्यात आलेल्या मनोरा आमदार निवासाच्या चार इमारती समुद्री वाळूमुळे कमकुवत झाल्याची बाब समोर आली आहे.नरिमन पॉइंट परिसरात समुद्राच्या किनाऱ्यावर उभारलेले आमदार निवासाचे प्रत्येकी १४ मजली चार दिमाखदार मनोरे आहेत. त्या इमारतींचे वय अवघे २२ वर्षे आहे. मंत्रालयालगतची ‘आकाशवाणी’ आणि फोर्ट भागातील ‘विस्तारित आमदार निवास’ या इमारती मनोºयाच्या तुलनेत जुन्या असूनही त्या भक्कम आहेत.विस्तारित आमदार निवासाच्या इमारतीचे लोकार्पण १९७२ साली झाले होते. तर आकाशवाणी आमदार निवासाची इमारत १९५९ साली खुली करण्यात आली होती. तत्कालीन मुंबई प्रदेशाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेली ती इमारत आज ५८ वर्षांची आहे. हेरिटेज श्रेणीतील ब्रिटिशकालीन मॅजेस्टिक आमदार निवासाची प्राचीन इमारतही तुलनात्मकदृष्ट्या उत्तम आहे.क्षाराने गिळले लोखंड१५८ आमदारांच्या राहण्याची व्यवस्था असलेल्या मनोरा आमदार निवासाचे स्लॅब आणि आधारस्तंभ जीर्ण झाले आहेत. काँक्रीटमधील लोखंडी सळ्यांना लागलेला गंज हे त्यामागचे मुख्य कारण असल्याचे बांधकाम खात्याच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. इमारत बांधकामात समुद्री वाळू वापरण्यात आल्यामुळे समुद्रातील क्षार काँक्रिटमध्ये शिरले. परिणामी इमारतीतील लोखंड गंजले. स्थापत्य अभियांत्रिकीनुसार, बांधकामासाठी समुद्रातील क्षारयुक्त रेती वापरण्यास मनाई असून केवळ नदीच्या पात्रातील रेती वापरण्यास अनुमती आहे.गंजणे म्हणजे काय?लोखंड गंजल्यामुळे ते फुगते. आकारमान वाढल्याने काँक्रीटला तडे जातात. लोखंडात आवश्यक असलेला ताण (टेन्शन) नाहीसे होते. वजन सहन करण्याची काँक्रीटची क्षमताच त्यामुळे संपते. परिणामत: आधारस्तंभ आणि स्लॅब खिळखिळे होतात. इमारत ढासळते.आमदारांच्या कक्षातकोसळला स्लॅबराष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या ‘मनोरा’तील कक्षाचा स्लॅब कोसळला होता. त्यानंतर इमारत पाडावी लागणार असल्याचा अभिप्राय बांधकाम खात्याने दिला.क्षार अर्थात सॉल्ट हे लोखंडाचे शत्रू आहेत. क्षारांमुळे लोखंड लवकर गंजते. काँक्रीटची क्षमता बाधित होऊन इमारत कोसळू शकते.- प्रशांत खापेकर, स्थापत्य अभियंता तथा तज्ज्ञ
समुद्री वाळूमुळे ‘मनोरा’ कमकुवत; बांधकाम युती शासनाच्या काळातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:40 AM