मुंबई : एकदा ठेच लागल्यावर माणूस शहाणा होतो असे म्हणतात़ पण अशा कोणत्याही अनुभवावरुन शहाणपण घेत नाहीत, त्याला महापालिका म्हणतात़ सहा वर्षापूर्वी पालिका मुख्यालयाच्या दारार्पयत अतिरेकी पोहोचले होत़े त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी यंत्रणा हलली़ मात्र आजही या महत्त्वाच्या विभागातच मनुष्यबळाचा तुटवडा आह़े
छत्रपती शिवजी टर्मिनस स्थानकासमोरील गेट क्ऱ 2 वर अतिरेक्यांचा गोळीबार होऊन एक सुरक्षा रक्षकही जखमी झाला होता़ देशाला हादरविणा:या या हल्ल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेसाठी समिती स्थापन होऊन दजर्ाेन्नतीसाठी शिफारशी झाल्या़ मात्र सहा वर्षानंतरही आपत्कालीन व्यवस्थापनाची ख:या अर्थाने प्रगती झालेली दिसून येत नाही़ विशेष म्हणजे आयुक्त स्वत: मुंबईच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख असताना या विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याची तक्रार आह़े पालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षात 37 मनुष्यबळ आवश्यक असताना आजच्या घडीला 2क् पद रिक्त असल्याने उर्वरित कर्मचा:यांना जादा काम करावे लागत असल्याचे सूत्रंकडून समजत़े झाड पडणो, पाणी तुंबणो यापासून बेकायदा बांधकामांच्या तक्रारी अशा आपत्तीशी संबंध नसलेल्या अनेक जादा कामाच्या ताणाखाली येथील कर्मचारी
आहेत़ (प्रतिनिधी)