Join us

मनप्रीत आत्महत्या प्रकरण : प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 3:10 AM

जोगेश्वरी पूर्वच्या मेघवाडी परिसरात रविवारी मनप्रीत सिंग (१४) नामक विद्यार्थ्याने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली. त्याला यासाठी परावृत्त करणाºया ‘त्या’ व्यक्तीचा जबाब मेघवाडी पोलिसांनी नोंदविला आहे.

मुंबई : जोगेश्वरी पूर्वच्या मेघवाडी परिसरात रविवारी मनप्रीत सिंग (१४) नामक विद्यार्थ्याने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली. त्याला यासाठी परावृत्त करणाºया ‘त्या’ व्यक्तीचा जबाब मेघवाडी पोलिसांनी नोंदविला आहे.या प्रकरणी सध्या अधिक चौकशी सुरू आहे. मनप्रीतला गच्चीवरून उडी मारताना समोरच्या इमारतीमधील एका व्यक्तीने पाहिले. तेव्हा त्याने त्याला मोठमोठ्याने आवाज दिला, मात्र तोपर्यंत त्याने खाली उडी मारली होती, असा जबाब त्याला अखेरचे पाहणाºया व्यक्तीने पोलिसांना दिला आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूमागे कोणत्याही प्रकारची संशयित बाब अद्याप समोर आली नसल्याचे मेघवाडी पोलिसांनी सांगितले. रविवारी रात्री उशिरा मनप्रीतवर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यानंतर त्याचे कुटुंबीय गावी निघाले. त्यामुळे घरच्यांपैकी कोणाचाही जबाब अद्याप नोंदविलेला नसल्याचे मेघवाडी विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांनी सांगितले.एक मोबाइल गेम खेळताना हा प्रकार त्याने केल्याची चर्चा आहे. त्या अनुषंगानेदेखील आम्ही तपास करत असून अद्याप या प्रकरणी अपघाती मृत्यूचीच नोंद करण्यात आल्याचे खेतले यांनी नमूद केले.