रणरणत्या उन्ह्यातही एलटीटी स्थानकावर माणसाचे तांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:06 AM2021-04-05T04:06:47+5:302021-04-05T04:06:47+5:30

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्याबाहेरील मजूर परत जात आहेत. एलटीटी ...

Man's hand at the LTT station even in the scorching heat | रणरणत्या उन्ह्यातही एलटीटी स्थानकावर माणसाचे तांडे

रणरणत्या उन्ह्यातही एलटीटी स्थानकावर माणसाचे तांडे

Next

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्याबाहेरील मजूर परत जात आहेत. एलटीटी रेल्वे स्थानकावर रविवारी रणरणत्या उन्हात माणसाचे तांडे पाहायला मिळाले.

रविवारी दुपारी रणरणत्या उन्हात मजूर आपल्या कुटुंबीयांसह एलटीटी स्थानकात आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे नियोजन केलेले नव्हते. ठिकठिकाणी माणसांचे तांडे होते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, बॅगा आणि इतर आवश्यक वस्तू सोबत घेऊन हे मजूर गावी गेले आहेत.

काेराेना रुग्णांची संख्या वाढू लागली. निर्बध कठोर करण्यात आले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, छाेट्या-छाेट्या कंपन्यामधील कामगार, लघु व्यावसायिक,राेजंदारीवरील कामगार लॉकडाऊनच्या चिंतेने हवालदिल झालेत. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस पुन्हा नकाेत,या भावनेने कामगारांनी घरची वाट धरली आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी,पनवेल तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत माेठी वाढ झाली आहे. एलटीटी टर्मिनसमधून लांब पल्ल्याच्या दरराेज २० गाड्या चालविण्यात येतात. त्यामध्ये सर्वाधिक गाड्या या उत्तर प्रदेश, बिहार,पटनाकरिता धावतात. या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. एलटीटी-गाेरखपूर, एलटीटी-वाराणसी, एलटीटी-पटना,एलटीटी-दरभंगा या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या माेठी आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

काेराेना रुग्णांची संख्या वाढू लागली. निर्बध कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपहार गृहे,छाेट्या-छाेट्या कंपन्यामधील कामगार गावी जात आहेत. मात्र त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेलं नाही. रेल्वे स्थानक परिसरात अनेक ठिकाणी सोशल डिस्टनसिंग पाळण्यात आले नाही.

प्रवाशांनी घेतला झाडाचा आधार

एलटीटी स्थानकात योग्य नियोजन नसल्याने प्रवाशांनी गर्दी केली होती. काही गाड्या दुपारच्या असल्याने रणरणत्या उन्हात प्रवासी येऊन बसले होते. मात्र उन्हाच्या झळा सहन न झाल्याने अनेकांनी झाडाच्या सावलीचा आधार घेतला.

कोरोनामुळे मजूर गावी जात आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गर्दी होणार नाही यासाठी नियोजन करावे. तसेच प्रवाशांना योग्य सोयी सुविधा द्याव्यात.

कृपाशंकर सिंग, माजी आमदार

मी ॲण्टाप हिल येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होतो. लॉकडाऊनच्या भीतीने आम्हाला कामावरून कमी करण्यात आले आहे. गेल्या महिन्याचा पगारही मिळाला नाही. कोरोना वाढत आहे त्यामुळे मी गावावरून तिकिटासाठी पैसे मागवून घेतले.

सौरभ मिश्रा, सुरक्षारक्षक

आता आठवड्यात दोन ते तीन दिवस काम मिळत आहे. त्या मिळणाऱ्या पैशांवर घर चालवणे कठीण आहे. तसेच कामावरून संध्याकाळी जेवायची सोय नाही. हॉटेल बंद आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये गावी जाताना खूप हाल झाले होते. त्यामुळे आताच गावी चाललो आहे.

अहमद खान, कामगार

Web Title: Man's hand at the LTT station even in the scorching heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.