मुंबई: मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Case) अडचणीत आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची गुन्हे शाखेतून उचलबांगडी करण्यात आली आहे. सचिन वाझेंवर हिरेन यांच्या पत्नीनं खुनाचा आरोप केला आहे. तरीही ते या पदावर ठेवलं जात असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. वाझेंना पाठिशी घालण्याचं कारण काय, असा सवाल भारतीय जनता पक्षाकडून उपस्थित करण्यात येत होता. अखेर या प्रकरणी ठाकरे सरकारला बॅकफूटवर जावं लागलं. वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुखAnil Deshmukh यांनी विधान परिषदेत केली. तावडे की गावडे! मनसुख हिरेन यांना नक्की कोणाचा कॉल आलेला, अद्याप गूढ कायम गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सचिन वाझे पुरावे नष्ट करू शकतात. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावं, अशी मागणी भाजपनं लावून धरली आहे. अखेर आज गृहमंत्री देशमुख यांनी वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र केवळ बदली नको, तर त्यांचं निलंबन करा, त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी विधानसभेसह विधानपरिषदेत केली. त्यामुळे या प्रकरणात सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.'आज त्यांना आम्ही सोडणार नाही'; विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजणारकाय म्हणाले अनिल देशमुख?मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. सचिन वाझे असो वा कुणीही, शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही. विरोधकांनी त्यांच्याकडील पुरावे एटीएसला द्यावेत, तसंच सचिन वाझे यांची बदली करण्यात येत असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधानपरिषदेत सांगितलं आहेकाय म्हणाले प्रवीण दरेकर?मी अजिबात समाधानी नाही. ठाकरे सरकार सचिन वझेंना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सचिन वझेंची बदली नाही, तर निलंबित केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सचिन वाझेंनीच मनसुख हिरेन यांचा खून केल्याचा आरोप हिरेन यांच्या पत्नीनं केला आहे, असं विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.