मनसुख हिरेनवर विषप्रयाेग नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:05 AM2021-06-06T04:05:37+5:302021-06-06T04:05:37+5:30

अहवालातून उघड; मृत्यूचे गूढ अद्यापही कायम विष प्रयोग झाला नसल्याचा अहवाल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात खळबळ उडवून ...

Mansukh Hiren is not poisoned! | मनसुख हिरेनवर विषप्रयाेग नाही !

मनसुख हिरेनवर विषप्रयाेग नाही !

Next

अहवालातून उघड; मृत्यूचे गूढ अद्यापही कायम

विष प्रयोग झाला नसल्याचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात खळबळ उडवून दिलेल्या ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येचे गूढ अद्याप राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) उलगडता आलेले नाही. त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाला, की त्यापूर्वी विष देण्यात आले, याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, त्याच्या पोटात कसलेही विषाचे अंश सापडले नसल्याचा अहवाल एनआयआयला मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे व त्याच्या सहकाऱ्यांनी ४ मार्चला रात्री हिरेनची हत्या केली. प्रसिद्ध उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फाेटकांनी भरलेल्या कार प्रकरणाच्या कटात सहभागी असलेल्या हिरेनने अटक होण्यास नकार दिल्याने त्याला मारण्यात आल्याचा संशय आहे. त्याचा व्हिसेरा राखून ठेवला असून, त्याबाबत एक वैद्यकीय अहवाल एनआयएला मिळाला आहे. त्यात हिरेनच्या पोटात विषाचे कसलेही अंश नव्हते, असे नमूद आहे. दरम्यान, त्याच्या मास्कवर क्लाेरोफार्म लावून त्याला बेशुद्ध करण्यात आले होते, ही बाबही सिद्ध होत नसल्याने तपास अधिकाऱ्यांचा संभ्रम वाढला आहे.

हिरेन याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला १ सेंटीमीटर बाय १ सेंटीमीटरच्या लाल रंगाच्या, तर चेहऱ्याच्या डाव्या नागपुडीजवळ दीड सेंटीमीटर बाय २ सेंटीमीटरची लाल खूण आढळली. उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खूण असल्याचेही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याच्या कुटुंबीयांनी याबद्दल सवालही उपस्थित केला होता.

* यामुळे वाढला संभ्रम

यापूर्वी हिरेनचा शवविच्छेदनाचा अहवाल एनआयएच्या टीमकडे आला होता. त्यानुसार, हिरेनचा मृत्यू पाण्यात बुडून झाला. त्याच्या फुप्फुसामध्ये खाडीतील पाणी आढळले. पण, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे मात्र समोर येऊ शकले नव्हते. आता त्याच्यावर विषप्रयाेग झाला नसल्याचेही समाेर आले आहे. त्याच्या मास्कवर क्लाेरोफार्म लावून त्याला बेशुद्ध करण्यात आले होते, ही बाबही पुराव्यानिशी सिद्ध हाेत नसल्याने तपास अधिकाऱ्यांचा संभ्रम वाढला आहे.

Web Title: Mansukh Hiren is not poisoned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.