मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पत्नी विमला यांनी उलगडला घटनाक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:06 AM2021-03-10T04:06:24+5:302021-03-10T04:06:24+5:30
- डॉ. पीटर न्यूटन यांची स्कॉर्पियो ३ वर्षांपासून पती मनसुख हिरेन वापरत होते - सचिन वाझे यांनी नोव्हेबर २०२० ...
- डॉ. पीटर न्यूटन यांची स्कॉर्पियो ३ वर्षांपासून पती मनसुख हिरेन वापरत होते
- सचिन वाझे यांनी नोव्हेबर २०२० रोजी स्कॉर्पियो वापरण्यासाठी नेली. त्यानंतर ५ फेब्रुवारीला त्यांच्या चालकामार्फत ती पुन्हा पाठवली.
- १७ फेब्रुवारी सायंकाळी ६.३०च्या सुमारास ठाणे येथून कारमधून ते मुंबईच्या दिशेने निघाले तेव्हा कार मध्येच बंद पडली. ते ओलाने पुढे गेले.
- १८ फेब्रुवारी : कार न सापडल्याने त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
- २५ फेब्रुवारी : रात्री एटीएसने हिरेन यांना बोलावून कारबाबत चौकशी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना घरी पाठवले.
- २६ : सचिन वाझेंसोबत पती गुन्हे शाखेत चौकशीसाठी गेले. तेथून रात्री १०.३० वाजता वाझेंसाेबतच घरी परतले.
- २७ फेब्रुवारी : पुन्हा वाझेंसोबत चौकशीसाठी गेले.
- २८ फेब्रुवारी : पुन्हा वाझेंसोबत चौकशीसाठी गेले. त्यांचा जबाब नोंदवून ती कॉपी घरी देण्यात आली.
१ मार्च : भायखळा पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र ते गेले नाहीत.
२ मार्च : संध्याकाळी दुकानातून घरी आल्यानंतर वाझेंसोबत मुंबईत गेले. तेथे त्यांच्या सांगण्यावरून वकील गिरी यांच्याशी संवाद साधला. पोलीस आणि माध्यमांकडून त्रास होत असल्याबाबत सांगत आयुक्तांकडे तक्रार केली.
३ मार्च : सचिन वाझेंनी अटक होण्याचा सल्ला दिला.
४ मार्च : कांदिवली गुन्हे शाखेकडून तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आल्याचे सांगून हिरेन बाहेर गेले.
५ मार्च : हिरेन यांचा मृतदेह आढळला.
...................
...