Join us  

मनपात मानापमान नाटय़

By admin | Published: June 20, 2014 12:05 AM

आयुक्तांना उद्देशून लकवा शब्दाचा उच्चार केल्यामुळे महापालिकेमध्ये मान - अपमान नाटय़ रंगले आहे.

नवी मुंबई : आयुक्तांना उद्देशून लकवा शब्दाचा उच्चार केल्यामुळे महापालिकेमध्ये मान - अपमान नाटय़ रंगले आहे. अधिका:यांनी या घटनेचा निषेध करून स्थायी समिती सभेवर बहिष्कार टाकला आहे. परंतु शिवसेना नगरसेवकही भूमिकेवर ठाम असून माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 
गत आठवडय़ातील स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शिवसेना नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी विकासकामे होत नसल्याची टीका करत आयुक्तांना लकवा भरला आहे का, अशी टीका केली होती. आयुक्त आबासाहेब ज:हाड यांनी या वक्तव्याचा निषेध करून माफी मागण्याची मागणी केली व सर्व अधिका:यांनी सभेवर बहिष्कार टाकला.  महापालिका अधिकारी संघटनेने आयुक्तांच्या भूमिकेला पाठिंबा देवून आजच्या सभेवर बहिष्कार टाकला. अधिका:यांच्या गैरहजेरीमध्ये आजची सभा पार पडली. मोरे यांनी याविषयी भूमिका मांडताना सांगितले की, मी जे शब्द वापरले ते कामकाजातून वगळण्यात आले आहेत. तो विषय संपला असून त्यासाठी माफी मागण्याचा प्रश्नच नाही. अधिका:यांनी अशाप्रकारे सभेला वेठीस धरणो चुकीचे असल्याचेही  त्यांनी स्पष्ट केले. सभेस न आल्यामुळे आयुक्तांवरच कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. 
राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी विकासकामांचे अनेक प्रस्ताव शिल्लक आहेत. कामकाज चालले पाहिजे असे मत व्यक्त केले. या प्रकरणी सभागृहाने माफी मागण्याचा प्रश्न नसल्याचे स्पष्ट केले. विजयानंद माने यांनी अधिनियमाची अधिका:यांना आठवण करून द्या असे मत व्यक्त केले. हा वाद अजून चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
 
सर्वसाधारण सभेवरही बहिष्कार ?
अधिकारी  संघटनेने शुक्रवारी होणा:या सर्वसाधारण सभेवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष रमाकांत पाटील यांनी सांगितले की, आयुक्तांनी संबंधित नगरसेवकाने माफी मागण्याची मागणी केली आहे. आम्ही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. उद्याही आम्ही सभेवर बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहोत. आता आयुक्तच पुढाकार घेवून हा विषय संपविणार की वाद वाढत राहणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.