Join us

राष्ट्रीय एकात्मतेसाठी उद्या मंथन मेळावा

By admin | Published: January 02, 2016 8:29 AM

तयारी सुरू : शेंडा पार्कच्या मैदानावर आयोजन

कोल्हापूर : राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी देशातील सर्व धर्मांतील लोकांना एकत्रित आणून चांगल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डातर्फे शेंडा पार्कजवळील मैदानावर उद्या, रविवारी सायंकाळी चार वाजता मंथन मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून, शुक्रवारी ७० टक्केकाम पूर्ण झाले आहे. मेळाव्याचे निमंत्रक हाजी अस्लम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातून सुमारे दीड लाख लोक यासाठी येणार आहेत. जवळपास ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. मेळाव्यासाठी ८० बाय ४५ चे व्यासपीठ उभारले असून, त्याच्या मागे १२ फूट उंच व ८० फूट रूंद स्क्रीन या व्यासपीठामागे लावण्यात येणार असून आज, शनिवारी सायंकाळी ते बसविण्यात येणार आहे. याशिवाय मैदानावर हॅलोजन लाईटस्, पार्किंग व्यवस्था, स्पीकर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. एक लाख लोक जमिनीवर खाली बसतील, अशी व्यवस्था असून, त्याकरिता मॅट अंथरण्याचे नियोजन केले आहे. मेळाव्यापूर्वी सकाळी १० वाजता ५ हजार विचारवंत व वकिलांची बैठक या मैदानावर होणार आहे. (प्रतिनिधी)