राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे मंत्रालयात ना चहा ना पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 05:35 AM2017-09-22T05:35:58+5:302017-09-22T05:36:00+5:30
मुंबई : राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे आज मंत्रालयात अधिकारी व अन्य कर्मचा-यांना चहादेखील मिळू शकला नाही. मंत्रालय कँटिनचे कर्मचारीही संपात सहभागी झाले होते.
चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांच्या संपामुळे एका विभागातून दुस-या विभागात वा माळ्यावर फाईली नेण्यासाठीही चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांची वानवा असल्याने अडचणी येत होत्या. हा संप बेकायदेशीर असल्याचे सांगत संपात सहभागी न होण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. संपात सहभागी होणाºयांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही सरकारने दिला आहे
>राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने गुरुवारी, शुक्रवारी दोन दिवसीय संप पुकारला आहे.