मुंबईतील सागरी प्रदूषणावरील माहितीपटाचे राज्यपालांकडून हस्ते प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:47+5:302021-06-01T04:06:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसह लगतच्या परिसरातील सागरी प्रदूषण या विषयावरील मराठी माहितीपटाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ऑनलाईन ...

Manual release of documentary on marine pollution in Mumbai by the Governor | मुंबईतील सागरी प्रदूषणावरील माहितीपटाचे राज्यपालांकडून हस्ते प्रकाशन

मुंबईतील सागरी प्रदूषणावरील माहितीपटाचे राज्यपालांकडून हस्ते प्रकाशन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईसह लगतच्या परिसरातील सागरी प्रदूषण या विषयावरील मराठी माहितीपटाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ऑनलाईन कार्यक्रमात सोमवारी प्रकाशन केले.

शिकागो येथे झालेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत उपस्थित राहण्यासाठी स्वामी विवेकानंद दिनांक ३१ मे १८९३ रोजी मुंबई येथून जहाजाने रवाना झाले होते. या घटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यपाल कोश्यारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत मुंबई व परिसरातील सागरी प्रदूषण या विषयावरील जनजागृतीपर मराठी माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले. विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशन या संस्थेच्या प्रोजेक्ट ब्लू अंतर्गत या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. कार्यक्रमाला परमार्थ निकेतनचे स्वामी चिदानंद सरस्वती, आचार्य लोकेश मुनी, रामकृष्ण मिशन बेलूर मठ येथील स्वामी विद्यानाथानंद, भजन गायक अनुप जलोटा व विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशनचे संस्थापक डॉ. राजेश सर्वज्ञ उपस्थित होते.

..............................

Web Title: Manual release of documentary on marine pollution in Mumbai by the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.