बंदरांजवळ मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर, तर नवी मुंबईत ऐरोसिटी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 09:01 AM2023-11-20T09:01:59+5:302023-11-20T09:02:27+5:30
१५० मिलियन डॉलर गुंतवणुकीसाठी ‘मित्रा’च्या सरकारला ३४१ शिफारशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी १५० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक आवश्यकता आहे. यासाठी राज्य आर्थिक सल्लागार समितीने (मित्र) राज्य सरकारला ३४१ शिफारशी केल्या आहेत. यामध्ये जेएनपीटी, दिघी व वाढवण बंदराजवळ मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्याची तसेच नवी मुंबई विमानतळाजवळ ‘ऐरोसिटी’ आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
मुंबईसाठीच्या शिफारशी
nमुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर सांस्कृतिक, मनोरंजन, टुरिझम आणि गृहनिर्मिती
nमुंबईत उच्च शैक्षणिक आणि कौशल्य विकासाचे हब तयार करावे
nविमानतळाशेजारी सेझच्या जमिनी पुनरुज्जीवित करण्याची आणि मुंबईत ऊर्जा विभागासाठी डाटा सेंटर सुरू करावे
nएमएमआर क्षेत्रात परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याची सूचना, सुमारे १५ ते १६ कोटी घरांची आवश्यकता
nमुंबईत येत्या काळात इंटिलिजन्स हब उभारण्याची गरज
nमुंबई, गोराई आणि अलिबाग येथे इको टुरिझम सुरू करावे. यामुळे परदेशी पर्यटकांची संख्या ५ मिलियनवरून १० मिलियनपर्यंत पोहोचेल.
नवी मुंबईत मीडिया सिटी, तर ठाण्यात थीम पार्क
nया शिफारशींमध्ये नवी मुंबईत येत्या काळात ग्लोबल मीडिया सिटी उभारण्याची सूचना करण्यात आली आहे, तर त्याचवेळी ठाण्यात फिल्म सिटी आणि थीम पार्क उभारता येऊ शकते, असे या शिफारशींमध्ये नमूद करण्यात आले आहे.
nविरार, बोईसर येथे बुलेट ट्रेनसाठी होणाऱ्या स्टेशनसाठीही इंटिग्रेटेड मास्टर प्लॅनिंगची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.