मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर कोविशिल्ड या लसीची घोषणा झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय संशोधन वैद्यकीय परिषद (आयसीएमआर)कडून मुंबईतील पालिकेच्या दोन रुग्णालयात या लसीची मानवी चाचणी होणार आहे, ही बाब समोर येताच केईएम आणि नायर रुग्णालयात कॉल्स आणि ईमेल्सचा पाऊस येत आहे, लसीसाठी तयारी असलेल्या सर्वसामान्यांची संख्या अधिक असल्याचे यातून दिसून येत आहे.आॅक्सफर्ड विद्यापीठाने पुण्यातील सिरस इन्टिट्यूटच्या साहाय्याने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीचा प्रयोग येत्या आठवड्यापासून केईएम व नायर रुग्णालयात करण्यात येणार आहे.फेझ २ आणि फेझ ३चा क्लिनिकल ट्रायलचा हा टप्पा असून याकरिता केईएम व नायरमध्ये सर्वसामान्यांनी आम्ही लसीसाठी तयार असल्याचे म्हणत कॉल्स व ईमेल्स केले आहेत. याविषयी, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले, लसीचा प्रयोग होणार असल्याचे जाहीर झाल्यापासून नोंदणीसाठी खूप कॉल्स व ईमेल येत आहे. मात्र याविषयी, थेट कॉलवर कोणताही अंतिम निर्णय वा नोंदणी करून न घेता त्याकरिता विशेष समितीद्वारे सर्व तपासण्या व सुरक्षेच्या नियमाअंती लसीचा प्रयोग करण्यात येणार आहे.>१६० व्यक्तींचीकरण्यात येणार नोंदणीकेईएम १८ वर्षांवरील व्यक्तींची या लसीच्या प्रयोगासाठी निवड करण्यात येईल. जवळपास एकूण १६० व्यक्तींवर केईएममध्ये ही मानवी प्रयोग चाचणी करण्यात येईल. मध्यम किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींवर या चाचणीचा प्रयोग करण्यात येईल का, याचे विश्लेषण होईल, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.>विशेष समितीदेणार परवानगीलसीच्या मानवी चाचणीकरिता येणाऱ्या व्यक्तींची कोविड चाचणी व अँटिबॉडी चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तींची नोंदणी करण्यात येईल. सर्व तपासण्या झाल्यानंतर त्या व्यक्तींना चाचणीसाठी पात्र असल्याची परवानगी विशेष समितीमार्फत देण्यात येईल, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.>पुण्यातील दोन संस्थांचीही निवडपुण्यातील केईएम रुग्णालय व भारती रुग्णालय अँड रिसर्च सेंटर या दोन संस्थांचीही या मानवी चाचणी प्रयोगासाठी निवड करण्यात आली आहे. बी.जे. गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज, जहांगीर मेडिकल कॉलेज या संस्थाही लसीच्या चाचणीसाठी केंद्राकडून मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच नागपूरमधील संस्थाही प्रतीक्षायादीत आहेत.
लसीच्या घोषणेनं उत्साह; प्रयोगासाठी अनेक कॉल्स, ईमेल अन् केईएम, नायरमध्ये नोंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 2:05 AM