सात ते आठ तास उशिराने उडाली अनेक विमाने, अडकलेल्या प्रवाशांना काेणी चहा-पाणीही विचारले नाही

By मनोज गडनीस | Published: December 1, 2023 11:10 AM2023-12-01T11:10:10+5:302023-12-01T11:11:37+5:30

Mumbai: प्रवासाला कमीत कमी वेळ लागावा, या उद्देशाने अनेक जण विमानाने जाणे पसंत करतात. अनेक विमान कंपन्या वेळच्या वेळी प्रवाशांना त्यांच्या ईप्सित स्थळी सोडतातही.

Many flights took off seven to eight hours late, no one even asked the stranded passengers for tea or water. | सात ते आठ तास उशिराने उडाली अनेक विमाने, अडकलेल्या प्रवाशांना काेणी चहा-पाणीही विचारले नाही

सात ते आठ तास उशिराने उडाली अनेक विमाने, अडकलेल्या प्रवाशांना काेणी चहा-पाणीही विचारले नाही

- मनाेज गडनीस
मुंबई - प्रवासाला कमीत कमी वेळ लागावा, या उद्देशाने अनेक जण विमानाने जाणे पसंत करतात. अनेक विमान कंपन्या वेळच्या वेळी प्रवाशांना त्यांच्या ईप्सित स्थळी सोडतातही. मात्र, गेल्या काही दिवसात अनेक विमानांनी नियोजित वेळेपेक्षा सात ते आठ तास उशिराने उड्डाण केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यातले पाच तर मुंबईविमानतळावरचेच आहेत. विमानांच्या विलंब सेवेमुळे प्रवाशांना  चहा-पाण्याची साेय तर दूरच उलट  होणाऱ्या मनस्तापासाठी दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्यही या विमान कंपन्यांनी दाखवलेले नाही. 

विमानाला विलंब झाला किंवा विमान रद्द झाले तर त्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खानपानाची व वेळ पडल्यास निवासाची व्यवस्था करणे ही विमान कंपन्यांची जबाबदारी आहे. दिल्लीमध्ये गेली दोन दिवसांपासून प्रदूषणामुळे अनेक विमाने विलंबाने उतरत आहेत. त्यामुळे दिल्लीत उतरून पुन्हा दुसऱ्या ठिकाणासाठी उड्डाण करण्यासाठी त्यांना विलंब होत आहे. परिणामी, दुसऱ्या ठिकाणी विमान विलंबाने आल्यामुळे तिथून अन्यत्र जाण्यासाठी पुन्हा विमानाला विलंब होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 विमान कंपन्यांतर्फे नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे.
 विलंब झालेल्या दोन विमानांतील प्रवाशांची काळजी न घेतल्याप्रकरणी २२ नोव्हेंबर रोजी नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियाला १० लाख रुपयांचा दंडही केला होता. 
 बहुतांश विमान कंपन्या एका मार्गावरून आलेले विमान दुसऱ्या मार्गाकडे रवाना करतात. त्या विमानाना जर विलंब झाला तर त्यांचे पुढचे सगळे वेळापत्रक काेलमडते. 

विलंबास कारण की...
 स्पाइस जेटचे गोव्याला जाणारे विमान बुधवारी दुपारी पावणे तीन वाजता उड्डाण करणे अपेक्षित होते. मात्र, त्या विमानाला उड्डाण करण्यासाठी रात्रीचे तब्बल पावणे अकरा उजाडले. धक्कादायक बाब म्हणजे, देशांतर्गत मार्गावर उड्डाण करणाऱ्या या विमानाचे कर्मचारी परदेशी होते. त्यांना परिस्थितीचे नीट आकलनही होत नव्हते. 
 स्पाइस जेटचे चेन्नई येथे जाणारे बुधवारी दुपारी ४ चे विमान तब्बल ११ वाजता निघाले. स्पाइस जेटच्या मुंबईतून भावनगर व कोची येथे जाणाऱ्या विमानांनाही विलंब झाल्याचे समजते. 
 एअर इंडिया एक्स्प्रेसचे बंगळुरूला जाणारे विमान बुधवारी रात्री सव्वाआठ वाजता उड्डाण करणे अपेक्षित होते. मात्र, या विमानाने पहाटे तब्बल अडीच वाजता उड्डाण केले. या दरम्यान विमानाला विलंब का झाला आहे.

Web Title: Many flights took off seven to eight hours late, no one even asked the stranded passengers for tea or water.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.