रायगडातील गौराईच्या परंपरा अनेक
By admin | Published: September 2, 2014 11:08 PM2014-09-02T23:08:01+5:302014-09-02T23:08:01+5:30
गौरीचे पूजन केल्यास आपल्या हिरव्या चुडय़ाचे अर्थात सौभाग्याचे संरक्षण होते, अशी मोठी श्रद्धा ग्रामीण भागात आहे.
Next
तिचे येणोच माहेरवाशिणीला ओढ लावून जाते. तिच्या येण्यासाठी ती उत्सुकतेने माहेरची ओढ लावून बसलेली असते. गणोशोत्सवात माहेरी जाता येणार ते गौराईच्या आगमनाचे निमित्त काढून. त्यामुळे हा दिवस माहेरवाशिणी बनलेल्या समस्त महिलावर्गाचे प्रतिनिधित्व करतो. आजही ग्रामीण भागात गौराईच्या आगमनाचे कोडकौतुक केले जाते आणि त्याला सगळीकडेच चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्या प्रथाही जोपासल्या जात आहेत, हे विशेष.
जयंत धुळप ल्ल अलिबाग
गौरीचे पूजन केल्यास आपल्या हिरव्या चुडय़ाचे अर्थात सौभाग्याचे संरक्षण होते, अशी मोठी श्रद्धा ग्रामीण भागात आहे. रायगड जिल्हय़ातील खारेपाटात विशेषत: वाशी ,वढाव, भाल या भागात या गौरीलाच ‘गौराई’ असे म्हटले आणि गौराई पूजनाची ही परंपरा सुमारे शंभर ते सव्वाशे वर्षाची असल्याची माहिती खारेपाटातील आगरी परंपरांचे अभ्यासक आणि निवृत्त शिक्षक देविदास म्हात्रे तथा म्हात्रे गुरुजी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गौराई डोक्यावर घेवून, पाटाला हात न धरता, गौराई नाचवण्याची परंपरा
गौराई पूजन परंपरेत, पाटावरील गौराई डोक्यावर घेवून, पाटाला हात न धरता, गौराई नाचवत साधारण दीड ते दोन किलोमिटर अंतर शेतातून वा शेताच्या बांधांवरुन घरी आणण्याची व नंतर विसजर्नास घेवून जाण्याची गेल्या तीस वर्षाची परंपरा पेण तालुक्यातील भाल-विठ्ठलवाडी येथे आहे. गौराईची आरती करताना देखील गौराई डोक्यावर घेऊन दोन्ही हात पाटाला न धरता आरती केली जाते. भाल गावातील ही डोक्यावरील पाटास हात न लावता गौराई नाचवण्याची परंपरा सरोज अशोक म्हात्रे यांनी गेली 3क् वष्रे अखंडीत जोपासली आहे. गौराई नाचवताना ती डोक्यावर घेवून दोन्ही हात सोडून शिडीची पाच ते सहा पावले चढताना व उतरताना पहाताना उपस्थित ग्रामस्थांच्या अंगावर काटा उभा राहील्याशिवाय रहात नाही.
गौराईचीच्या जागरणाकरिता नाच-फुगडय़ांसह पारंपरिक गाण्याची साथ
गौराईची रात्र जागवताना अन्य महिलांचे नाच-फुगडय़ा असतात. नाचताना रामायण, महाभारत, व आधुनिक काळातील प्रसंगावर स्वरचित पारंपरिक गीते म्हटली जातात. गौराईची आरती करण्यापूर्वी तिचे स्तवन केले जाते...
त्रिपूर सुंदरी अंबा नमितो जगदंबा, जगदंबा अंबा वस्त्र नेसती कंबा !
नमितो जगदंबा जगदंबा!
नारायण हरी बाले!
ओवाळीता जगदंबा!!
नमितो जगदंबा जगदंबा!!
नको जाऊ पार्वती दुबळे माहेरा
देईन तुला ग गजनी चोळी
देईन तुला सोन्याचा सूप
नको मला ईश्वरा सोन्याचा सूप
देईल मला बंधू माझा
कांबीचा सूप..
माहेर आणि सासराला जोडून ठेवणारा संस्कार
गौराईचा भाऊ जरी गरीब असला तरी भावाबद्दल तिला आदर वाटतो. ती म्हणते माझं माहेर गरीब असलं तरी ते मला o्रीमंतीपेक्षाही प्रिय आहे. माहेर आणि सासराला जोडून ठेवणारा संस्कार यातून दिला जातो. गौर आपल्या भावाची बहरलेली शेती पाहून सुखावते, हरखून जाते. पार्वती माहेराला गेल्यानंतर शंकराला ती माहेरहून कधी येते असं होतं आणि श्रीशंकरदेव पार्वतीला उशीर झाल्याबद्दल रागावतात, त्यावर गौराई शंकराची समजूत काढताना म्हणते..
आईची भेट घेता, उशीर झाला..
भावाची भेट घेता, उशीर झाला..
ही सारी पारंपरिक गाणी गौरीच्या आगमनाच्या रात्री कानी पडतात. आणि पूजनांती विसजर्नास जाताना, आम्हा सर्वाना सुखी ठेव व पुढच्या वर्षी आनंदाने आमच्या घरी पुन्हा ये, असे गा:हाणो घालूनच तिची पाठवणी होते.
गौरीपूजनाची कथा मोठी रंजक आहे. देवांना व प्रजेला त्रस देणा:या कौलासूर दैत्याच्या क्रौर्याची परिसीमा गाठल्यामुळे आपल्या पतीदेवांची काळजी त्यांच्या पत्नींना निर्माण झाली. त्यावेळी त्यांनी श्री शंकर आणि श्री विष्णू यांना गा:हाणो घातले, तेव्हा श्री शंकर आणि श्री विष्णू या दोघांच्या तेजापासून महालक्ष्मीचा म्हणजेच गौरीचा जन्म झाला, अशी कथा सांगितली जाते. या निमित्तानेच गौरीचे पूजन करुन कौलासूर दैत्यासारख्या अपप्रवृत्तींचा नायनाट करण्याचे आवाहन केले जाते.
गौरी सोन्याच्या पावलाने आली
1मोहोपाडा/
रसायनी : रसायनी व आसपासच्या परिसरातील भागात गौरी देवींचे आगमन मंगळवारी सायंकाळी झाले. गणरायाच्या आगमनानंतर पाचव्या दिवशी माहेरवाशीण गौरी देवींचे आगमन झाल्याने परिसरात सर्वत्र चैतन्य निर्माण झाले आहे. गौरीच्या आगमनाने महिलांनी ठिकठिकाणी भवर घेत गौराईची गाणी म्हणत नृत्याचे फेर धरले.
2गौरी कशाने आली, गौरी सोन्या-मोत्यांच्या पावलाने आली, असे म्हणत तुळशी वृंदावनापासून सुवासिनींनी गौरी घरात आणली. घरासमोर सुबक रांगोळी काढून अंगणापासून घरार्पयत सजावट करण्यात आल्याचे चित्र दिसत होते. तुळशी वृंदावनापासून गणपतीच्या जागेर्पयत गौरी आल्याचे पावले काढली जात असल्यामुळे या पावलांचे पूजन करण्यात आले. सुवासिनी स्त्रिया आपल्या गौरीला घरभर फिरवून आणले.परंपरागत गौरीचे स्वागत झाल्यानंतर गौरीला सायं. तांदळाची भाकरी आणि माठाच्या भाजीचा नैवेद्य दाखवण्यात येतो.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून उत्सव अव्याहत सुरू
4चिरनेर : स्वातंत्र्यपूर्ण काळापासून दरवर्षी अगदी भक्तीभावाने साजरा होणारा उरण पूर्व भागातील खोपटे गावचा गौरा उत्सवाचे यंदाचे 73 वे वर्ष असून यावर्षीच्या गौरा उत्सवाची जोरदार तयारी शिवकृपा गौरा मंडळाने केली आहे. दरवर्षी एखादी पौराणिक किंवा ऐतिहासिक देखाव्याची आरास साकारणा:या या मंडळाने या वर्षीसाठी महाभारतातील जरासंध राजाच्या एका प्रसंगाचा देखावा साकारला असून यावर्षीही या उत्सवाला किमान 5क् हजारांपेक्षा जास्त भाविक भेट देतील असा विश्वास शिवकृपा गौरा मंडळाच्या पदाधिका:यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला आहे.
4महिलांचे भवर, नृत्य, समाजविघातक प्रवृत्तींवर प्रहार करणा:या विविध विषयांच्या नकला आणि विसर्जनासाठी खास शक्तीवाले व तुरेवाले यांच्या नाचांचे जंगी सामने असा खासमखास कार्यक्रम यावर्षीच्या गौरा उत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.
41941 साली खोपटे असा खासमखास कार्यक्रम या वर्षाच्या गौरा उत्सवाच्या निमित्ताने सध्या गावात एक टुमदार असे शिवशंकराचे मंदिर उभे राहिले असून वर्षाचे बारा ही महिने गावातील भाविक एकत्र येऊन मंदिरात सकाळ संध्याकाळ आरती केली जाते.
4कै. विश्वनाथ नामा पाटील हे 1941 या मंडळाचे पहिले अध्यक्ष होते तर आता ती जबाबदारी नव्या दमाच्या देवेंद्र पाटील यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. पूर्वीच्या काळी ह.भ.प. दामोदर शंकर पाटील आणि गणपत गोवर भगत यांनी आपले राहते घर गौरा उत्सव साजरा करण्यासाठी दिले होते . मात्र मागील काही वर्षापूर्वी पनवेल येथील एक दानशूर व्यक्तीमत्व असलेल्या परेशशेठ देढिया यांनी केलेल्या भरघोस मदतीत ग्रामस्थांनी ही घरटी वर्गणी गोळा करुन गौ:यासाठी एक खास असे मंदिर उभे झाले आहे.
4ज्या मंदिराचा घुमट लांबून पाहिल्यास शंकराच्या पिंडीसारखाच असल्याचे दिसत आहे. उद्याच्या गुरुवारपासून सुरु होणा:या या गौरा उत्सवाची सांगता शनिवारी होणार आहे. या तीन दिवसांमध्ये पूर्व भागातील अनेक गावोगावच्या महिला स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी येऊन आगरी - बोली भाषेतील भवरनृत्ये साजरी करीत असतात. या निमित्ताने गौरा उत्सवास भेट देणारे तालुकाभरातील विविध अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, त्याचबरोबर परिसरातील प्रकल्पांचे अधिकारी आदींचा सत्कार समारंभ केला जातो.
4कार्यक्रमाच्या निमित्ताने खोपटे पाटीलपाडय़ातील ग्रामस्थ आपले सर्व मतभेद बाजूला ठेऊन एकदिलाने काम करीत असतात. त्यामुळेच गेली 72 वष्रे हा उत्सव मोठय़ा आनंदाने साजरा होत असून या वर्षीही तो मोठय़ा दिमाखात साजरा केला जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील यांनी बोलतांना दिली आहे.