Join us  

जुगाड! प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये झालं; प्रवाशांनी डोकं लढवलं; ४० रुपये वाचले ना भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 7:00 PM

भारतीयांची बातच न्यारी; तिकीट घेऊन प्लॅटफॉर्मवर जाणार अन् ४० रुपयेदेखील वाचवणार

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अनेक निर्णय घेतले जात आहेत. रेल्वे फलाटांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागदेखील प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून प्लॅटफॉर्म तिकीट थेट ५० रुपये करण्यात आलं. महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांसाठी ही दरवाढ लागू करण्यात आली. नातेवाईकांना सोडण्यासाठी, आणण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी कमी व्हावी, या हेतूनं हा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याला बगल देण्यासाठी लोकांनी लगेच जुगाड शोधून काढला.प्लॅटफॉर्म तिकीट आता ५० रुपये, तरी स्थानकांवरील गर्दी ओसरेनाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस यांच्यासह ठाणे, पनवेल, कल्याण आणि भिवंडी रेल्वे स्थानकाचं फलाट तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आलं. २४ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. १५ जूनपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू राहील. फलाटावरील गर्दी कमी करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला गेला.एक स्टेशन पुढचं तिकीट घ्या अन् ४० ते ४५ रुपये वाचवा!सध्या ५० रुपये प्लॅटफॉर्म तिकीट असलेल्या रेल्वे स्थानकांवर जायचं असल्यास ५० रुपये मोजावे लागत आहेत. आधीच्या तुलनेत ही रक्कम ४० रुपयांनी अधिक आहे. पण काही हुशार प्रवासी आजही ४० रुपये वाचवत आहेत. हे प्रवासी प्लॅटफॉर्मवर जायचं असल्यास प्लॅटफॉर्म तिकिटाऐवजी थेट पुढील स्थानकाचं रिटर्न तिकीट घेतात. हे तिकीट प्लॅटफॉर्म तिकिटापेक्षा स्वस्त आहे.उदाहरणार्थ: ठाणे रेल्वे स्थानकात जायचं असल्यास अनेक जण मुलुंड किंवा कळव्याचं तिकीट घेतात. एकदा तिकीट घेतलं की तुम्हाला एक तासाच्या आत प्रवास करायचा असतो. त्या एका तासात अनेकजण पाहुण्यांना सोडून किंवा घेऊन येतात. ठाण्याहून मुलुंड किंवा कळव्याचं तिकीट ५ रुपये इतकं आहे. रेल्वे स्थानकात एका तासापेक्षा जास्त वेळ लागणार असल्यास काही हुशार मंडळी पुढील स्थानकाचं रिटर्न तिकीट घेतात. ठाणे ते मुलुंड, ठाणे ते कळवा रिटर्न तिकीट १० रुपये आहे. विशेष म्हणजे या तिकिटाची वैधता दिवसभर आहे. तर ५० रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधता २ तासच आहे.

टॅग्स :भारतीय रेल्वेकोरोना वायरस बातम्या