मुंबई : काही औषधे उपचारासाठी पटकन गुणकारी ठरतात, मात्र त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याची नशा होते. हा फाॅर्म्युला माहीत पडल्याने अनेक जण कफ सिरपची नशा करतात. ही बाब लक्षात घेत मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरात कारवायांचा सपाटा लावून ८५ लाख ८२ हजार ८४८ रुपयांचे १६१८.७३०० लिटर औषध जप्त केले. वेगवेगळ्या कारवायांमध्ये ६३ गुन्हे दाखल करून ९९ जणांना अटक करण्यात आली आहे.
हे दृष्परिणाम :
या औषधांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मेंदू मंदावतो, शरीरातील इतर अवयांची क्रियेची गतीही कमी होते आणि ब्रेन डेड होऊन मृत्यू ओढावू शकतो.
आपल्यापैकी बहुतेक जण खोकला झाल्यानंतर बेनाड्रील कफ सिरप, चेस्टन कफ सिरप, हनीटस कफ सिरप, ॲस्कोरिल कफ सिरपचं सेवन करतात.
जेव्हा छातीत श्लेष्मा किंवा खोकला जमा होतो तेव्हा कफ सिरप घेतल्यानंतर बरे वाटते. मात्र याहून काही अधिक प्रभावी कफ सिरप आहेत.
गेल्या वर्षभरात औषध जप्त ८५ लाख ८२ हजार ८४८ रुपयांचे १६१८.७३०० लीटर
१२ महिन्यांत ८५ लाखांचे कफ सिरप जप्त.
यासाठी गुणकारी :
ते केवळ सतत खोकला येत असल्यास डॉक्टर ते औषध लिहून देतात. हे औषध ठरलेल्या प्रमाणातच घ्यावे लागते. अन्यथा त्वरित औषधाची नशा होते.
१०० मिली औषधाचे सेवन केल्यास साधारण तीन-चार तास व्यक्ती नशेत धुंद राहते.
आजच्या घडीला तरुणाई मोठ्या प्रमाणात विविध नशेच्या आहारी जात आहेत. अनेक नशांमुळे तोंडाला उग्र वास येतो अन् नशा केल्याचे समाेरच्याला लगेच समजते. यामुळे नशा करण्यासाठी पर्याय शोधले जाते. स्वस्तात मस्त म्हणून कफ सिरपचे सेवन करण्यात येत आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आणि शहर, उपनगरात कफ सिरपच्या बाटल्यांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाया केल्या.
प्रिस्क्रिप्शन शिवाय मेडिकलवाल्यांनी कुठल्याही प्रकारचे औषध देऊ नये. मात्र, काही निवडक विक्रेता आपला गल्ला भरण्यासाठी कफ सिरअप विकतात. यामुळे नशेसाठी सहज औषधे उपलब्ध होतात. - डॉ. दीपक हिंडे, पोलिस उपनिरीक्षक, मालवणी