पायलट नसल्याने अनेक विमान उड्डाणे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 12:46 AM2019-02-13T00:46:21+5:302019-02-13T00:46:41+5:30

चालकांच्या (पायलट्स) टंचाईचा फटका इंडिगोच्या वेळापत्रकाला बसला आणि मंगळवारी ३० विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे आम्हाला प्रवासासाठी महाग तिकिटे घ्यावी लागली असा आरोप प्रवाशांनी केला, असे सूत्रांनी सांगितले.

 Many pilots canceled because of no pilot | पायलट नसल्याने अनेक विमान उड्डाणे रद्द

पायलट नसल्याने अनेक विमान उड्डाणे रद्द

Next

मुंबई : चालकांच्या (पायलट्स) टंचाईचा फटका इंडिगोच्या वेळापत्रकाला बसला आणि मंगळवारी ३० विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे आम्हाला प्रवासासाठी महाग तिकिटे घ्यावी लागली असा आरोप प्रवाशांनी केला, असे सूत्रांनी सांगितले.
इंडिगोचे मुख्यालय गुरुग्राममध्ये आहे. सोमवारीही कंपनीला तब्बल ३२ उड्डाणे रद्द करावी लागली. गेल्या शनिवारपासून इंडिगोने एवढ्या मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द केल्यानंतरही नागरी हवाई वाहतूक नियंत्रकांकडून याची चौकशी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. सध्या इंडिगोमध्ये सुरू असलेल्या पायलट्सच्या प्रश्नामुळे मंगळवारची ३० उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. यातील बहुतेक उड्डाणे ही हैदराबाद, कोलकाता आणि चेन्नईतील आहेत. कोलकात्याहून आठ उड्डाणे होणार नाहीत, हैदराबादची पाच आणि बंगळुरू व चेन्नईची प्रत्येकी चार उड्डाणे रद्द झाली आहेत. इंडिगो आम्हाला एकतर शेवटच्या क्षणी तिकीट घ्यायला किंवा एके ठिकाणच्या थांब्यासह प्रवासाला जास्त वेळ लागेल अशा पर्यायी विमानांनी जायला भाग पाडत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. यासंदर्भात इंडिगो आणि नागरी उड्डयन महासंचालकांना विचारण्यात आले. परंतु, त्यांच्याकडून उत्तर आलेले नाही.

Web Title:  Many pilots canceled because of no pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई