अनेक वीज कनेक्शन? आता बिल भरा एकाच क्लिकवर; वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूट

By सचिन लुंगसे | Published: May 28, 2024 07:38 PM2024-05-28T19:38:11+5:302024-05-28T19:38:32+5:30

राज्यामध्ये पोलीस, ग्रामविकास, पाणीपुरवठा अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या कंपन्यांना एका समस्येला तोंड द्यावे लागते.

Many power connections? Now pay bill in one click; One percent discount if bill is paid on time | अनेक वीज कनेक्शन? आता बिल भरा एकाच क्लिकवर; वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूट

अनेक वीज कनेक्शन? आता बिल भरा एकाच क्लिकवर; वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूट

मुंबई - राज्यात ठिकठिकाणी अनेक वीज कनेक्शन आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा, अशी समस्या असलेल्या विविध सरकारी खात्यांसाठी व खासगी कंपन्यांसाठी महावितरणने सर्व कनेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूटही संबंधितांना मिळणार आहे.

राज्यामध्ये पोलीस, ग्रामविकास, पाणीपुरवठा अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या कंपन्यांना एका समस्येला तोंड द्यावे लागते. राज्यामध्ये त्यांच्या विविध कार्यालयांची विविध वीज कनेक्शन आणि त्यांची बिले भरण्याची वेगवेगळी अंतिम मुदत असल्याने आर्थिक तरतूद असूनही वेळेत बिले भरली नाहीत, अशी समस्या येते. त्यामुळे दंड आणि व्याज द्यावे लागते. तसेच कधी कधी बिल भरले नसल्याने कनेक्शन तोडले जाते. महावितरणने उपलब्ध केलेल्या सुविधेमुळे एकदा ऑनलाईन नोंदणी केली की संबंधित सरकारी खात्याला किंवा कंपनीला त्यांच्या मुख्यालयात बसून राज्यातील विविध ठिकाणच्या वीज कनेक्शनसाठी आलेली बिले आणि त्यांची अंतिम मुदत याची माहिती मिळेल. प्रत्येक बिल वेळेत भरल्यास एक टक्का सवलत मिळेल.

किमान दहा वीज कनेक्शन असलेला कोणताही सरकारी विभाग किंवा खासगी कंपनी याचा लाभ घेऊ शकतात.
कागदी बिलाच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक बिल स्वीकारल्यामुळे प्रत्येक बिलामागे दहा रुपये सवलत
डिजिटल पेमेंट केल्यामुळे कमाल पाचशे रुपये सवलतही मिळेल.

Web Title: Many power connections? Now pay bill in one click; One percent discount if bill is paid on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज