Join us

राज्यात बरेच प्रोजेक्ट सुरू, उद्धव ठाकरेंचा हफ्ता बंद झाल्यानं ते दुःखी - मोहित कंबोज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 2:26 PM

उद्धव ठाकरेंकडून सातत्याने भाजपावर आक्रमक हल्ले सुरू आहेत त्यात भाजपानेही त्यांच्यावर पलटवार केला आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार आज संपणार आहे. तत्पूर्वी उद्धव ठाकरे-भाजपा यांच्यात आरोपांच्या फैरी सुरू झाल्यात. त्यात राज्यात बरेच प्रोजेक्ट सुरू आहेत. त्यातील हफ्ता बंद झाल्याने उद्धव ठाकरे दुःखी आहेत असा खोचक टोला भाजपा नेते मोहित कंबोज यांनी लगावला आहे. 

मोहित कंबोज यांनी ट्विट करून म्हटलंय की, महाराष्ट्रात रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. १८५०० प्रोजेक्ट सुरू आहेत. राज्याच्या विकासासाठी ५ लाख कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. BSE-NSE शेअर मार्केटही चांगले सुरू आहे. उत्पादन क्षेत्रात राज्यात मोठी वाढ होतेय अशावेळी उद्धव ठाकरेंचा हफ्ता बंद झाल्यानं ते दु:खी आहेत हे दिसून येते. उद्धव ठाकरेंना केवळ वसुली समजते असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंकडून सातत्याने भाजपावर आक्रमक हल्ले सुरू आहेत त्यात भाजपानेही त्यांच्यावर पलटवार केला आहे. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जशी अचानक नोटबंदी जाहीर केली, त्यास आपण डिमोनटायझेशन म्हणतो, तसेच ४ जूनला संपूर्ण देश ‘डिमोदीनेशन’ करणार आहे. पंतप्रधान म्हणून मोदीजी शेवटचे मुंबईत आले आहेत. जे बोलायचे ते त्यांनी बोलून घ्यावे. दि. ४ जूननंतर तुम्ही फक्त मोदी म्हणून राहणार आहात, देशाचे पंतप्रधान नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. इंडिया आघाडीच्या प्रचाराची सांगता सभा शुक्रवारी बीकेसी येथील मैदानात पार पडली. निवडणुकीची ही सांगता सभा विजयाची नांदी ठरवणारी सभा असल्याचे ठाकरे म्हणाले. दोन वेळा राज्याने तुमच्यावर प्रेम केले. ४० पेक्षा जास्त खासदार दिले. मला त्याचा पश्चाताप होत असल्याचे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :मोहित कंबोज भारतीयउद्धव ठाकरेभाजपा