मुंबई : विकास नियोजन आराखड्यात पायाभूत सुविधांसाठी आरक्षण ठेवताना एकाच वेळी अनेक सुविधांकरिता राखून ठेवण्याची संकल्पना पालिकेने आणली आहे़ यामुळे स्मशानभूमी व उद्यान तर मंडई व बेघरांसाठी निवारा असे अजब आरक्षण ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे़विकास नियोजन आराखडा तयार झाला तरी उपलब्ध जागेतच भविष्यासाठी सुविधांची तरतूद करणे भाग आहे़ त्यामुळे सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांमध्ये शहराचा विकास करताना असे दुुहेरी आरक्षण तब्बल ६५० भूखंडांवर करण्यात आले आहे़ मुंबईत जागेची कमतरता आहे, यामुळेच अशा प्रकारचे आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे़यामध्ये मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन प्राथमिक आरक्षण करण्यात येईल़ त्यानंतर अन्य दुय्यम उद्दिष्टांसाठी जागा राखीव असणार आहे़ एका वेळी दोन सुविधांचे आरक्षण असले तरी वापरकर्त्यांची गैरसोय होणार नाही, असा दावा विकास नियोजन खात्यातील एका अधिकाऱ्याने केला़ (प्रतिनिधी)
एका भूखंडावर अनेक आरक्षणे
By admin | Published: June 04, 2016 2:03 AM