Join us  

'अनेकांना मुख्यमंत्री व्हायचंय, आता मला काही व्हायचंच नाही'; उद्धव ठाकरेंनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 6:38 PM

आज उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

मुंबई-  आपल्याला जी संधी मिळते त्या संधीचा उपयोग काहीतरी देण्यासाठी करायला हवा, पदं येतात पदं जातात. मला काहीतरी व्हायचे आहे म्हणून  काहीही करायचे. आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, माझ्यातरी आता मनातही येत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आज ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व लोकमत समुहाचे संस्थापक श्री.जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगता समारोह सोहळ्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी आता सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर टीका केली.  

शोक चव्हाणांकडून उद्धव ठाकरेंचा लाडके मुख्यमंत्री उल्लेख; कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक

उद्धव ठाकरे म्हणाले, जी संधी आपल्याला मिळते त्यात देण्यासाठी आपण काय केले. याचा विचार आपण केला पाहिजे, आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायच आहे. आता माझ्या मनातही येत नाही. हल्ली ज्यांनी घडवले आहे त्यांनाच पळवले जात आहे. हे असंच राजकारण सध्या सुरू आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तेव्हा असंख्य लोकांनी भागल आहे. कष्ठ केलं आहे. म्हणून आता आपण सुखाने राहू शकतो. पण, आता ज्या विचारसरणीचा स्वातंत्र लढ्याशी काहीच कर्तृत्व नव्हत ती विचारसरणी आता देशावरीत राज्य करते आणि देशाला कह्यात घेऊ इच्छीते, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. 

अनेकजण आणीबाणी विषयी सांगतात. त्यावेळी ज्यांच्यावर अत्याचार झाले ते चुकीचेच होते. पण, त्यानंतर ज्यांनी आणीबाणी लादली होती त्यांनी आपल्या विरुद्ध प्रचार करायला वेळ दिला होता. लोकांना विरोधात उतरायला दिलं ही सुद्धा लोकशाही म्हणायच. पण, आता बोलायला लागले की विरोधकांचं तोंड बंद केलं जातं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे म्हणाले, कोविड काळातील भ्रष्टाचार काढा, पण खंत एका गोष्टीची वाटते संपूर्ण जग कोरोनाग्रस्त असताना मुंबई मॉडेलचे जगाने कौतुक केले. तुम्ही कौतुक केलं नाही, पण बदनाम करत आहेत. कोविड काळातील चौकशी करा पण पीएम केअर फंडाचे काय झाले याचीही चौकशी करा. आता म्हणत आहेत पीएम केअर फंड हा सरकारचा नाही म्हणजे पीएम केअर हे नाव असंच ठेवलं का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. पीएम केअर फंडात सर्वसामान्य लोकांनी पैसे दिले आहेत. मग ते पैसे गेले कुठे, असंही ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनालोकमत