Join us

अनेक वर्षांपासून भारतीयांनी पाहिलेले एक स्वप्न सत्यात उतरले - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 21:37 IST

मुंबई -  अनेक वर्षांपासून भारतीयांनी पाहिलेले एक स्वप्न सत्यात उतरले आहे.  स्वतंत्र भारताच्या या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण आहे. ...

मुंबई -  अनेक वर्षांपासून भारतीयांनी पाहिलेले एक स्वप्न सत्यात उतरले आहे.  स्वतंत्र भारताच्या या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण आहे. लाखो भारतीयांनी दीर्घकाळापासून पाहिलेले एक स्वप्न  सत्यात उतरले आहे, अशी प्रतिक्रिया कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

 मुख्यमंत्री म्हणाले की, ''आधी देश' या तत्त्वाचा प्रत्यय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी आणून दिला आहे. जम्मू-काश्मीरची एकात्मता आणि तेथील विकासाच्या दृष्टीने  अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी असा हा निर्णय आहे. 'जहाँ हुएँ बलिदान मुखर्जी, वह कश्मीर हमारा है!'  हे स्वप्न उराशी बाळगून माझ्यासारखे असंख्य लोक जगत आले आहेत.त्या स्वप्नाची पूर्तता पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी आज केली आहे. काश्मीरसाठी दिवंगत शामाप्रसाद मुखर्जी यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण आज पुन्हा होत आहे.''  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसकलम 370जम्मू-काश्मीर