मराठा आंदोलक आक्रमक, ठिय्या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:00+5:302020-12-15T04:25:00+5:30
मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आंदोलकांनी रविवारी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ठिय्या आंदोलन सुरू ...
मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आंदोलकांनी रविवारी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर, आंदोलकांच्या एका गटाने विधानसभेकडे मोर्चा वळविला. तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करत, त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, नाशिक, रायगड आणि मराठवाड्यातून मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. आझाद मैदानात आंदोलन सुरू असतानाच, सीएसटी स्थानकावरही जोरदार ठिय्या आंदोलन सुरू झाले. ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘ठाकरे सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला आहे. आंदोलकांनी ऐन रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केल्याने या परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली होती.