सीएसएमटी स्थानकही बनले ‘मराठा’मय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 04:16 AM2017-08-10T04:16:50+5:302017-08-10T04:16:50+5:30

राज्यभरातील मोर्चेकºयांच्या आगमनानंतर सीएसएमटी स्थानकही ‘मराठा’मय झाल्याचे दिसून आले. मोर्चेकºयांनी रेल्वे स्थानक परिसरातदेखील ‘शिस्तबद्ध’तेची प्रचिती दिली. बुधवारी सकाळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी स्वत: सीएसएमटी स्थानकाची पाहणी केली.

'Maratha' became the CSMT station | सीएसएमटी स्थानकही बनले ‘मराठा’मय

सीएसएमटी स्थानकही बनले ‘मराठा’मय

Next

महेश चेमटे  
मुंबई : राज्यभरातील मोर्चेकºयांच्या आगमनानंतर सीएसएमटी स्थानकही ‘मराठा’मय झाल्याचे दिसून आले. मोर्चेकºयांनी रेल्वे स्थानक परिसरातदेखील ‘शिस्तबद्ध’तेची प्रचिती दिली. बुधवारी सकाळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी स्वत: सीएसएमटी स्थानकाची पाहणी केली. त्यानुसार सर्व वरिष्ठ अधिकाºयांना आवश्यक त्या सूचना दिल्या. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. के. श्रीवास्तव हे सातत्याने महाव्यवस्थापक शर्मा यांच्या संपर्कात होते.

मंगळवारपासून मोर्चेकरी रेल्वेने शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली. या मोर्चेकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे विविध स्थानकांवर उद्घोषणा करण्यात येत होत्या. मुंबईकरांची वर्दळ असणारे सीएसएमटी स्थानक मोर्चेकºयांनी व्यापले होते. हातात भगवे झेंडे व डोक्यावर ‘एक मराठा, लाख मराठा’ असे लिहिलेल्या गांधी टोपीमुळे हे स्थानक ‘मराठा’मय झाल्याचे दिसून आले.

वैद्यकीय सेवाही तत्पर : राज्य सरकारने १३० सरकारी डॉक्टर आणि १५ अ‍ॅम्ब्युलन्स तैनात केल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज मेडिकोसचे डॉक्टरही वैद्यकीय सेवेसाठी तत्पर असलेले दिसून आले. सर जे.जे. व केईएम रुग्णालयाने वैद्यकीय सेवा पुरविली. महापालिका आणि आझाद मैदान येथील आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्रांवर ३,८९३ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

Web Title: 'Maratha' became the CSMT station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.