Join us

मराठा समाजाला आरक्षणासाठी हवे घटनादुरुस्तीचे संरक्षण: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 6:16 AM

आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी सरकारची भूमिका आहे का? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देताना केंद्राने घटनादुरुस्ती केली आणि त्या आरक्षणाला ५० टक्क्यांच्या मर्यादेपासून संरक्षण दिले. मराठा आरक्षणाला सुद्धा असेच  घटनात्मक संरक्षण द्यावे, अस मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त करत राज्य सरकारने जारी केलेल्या जाहिरातीवर टीका केली.   

राज्य सरकारने रविवारी प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणासंदर्भात जाहिरात प्रकाशित केली आहे. ‘शुद्ध मनानं आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा’, असे या जाहिरातीत म्हटले आहे. यावर चव्हाण यांनी खेद व्यक्त केला. मराठा समाजाने १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, असे या जाहिरातीतून सुचवायचे आहे का? आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी सरकारची भूमिका आहे का? असा सवालही अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देताना केंद्राने घटनादुरुस्ती केली आणि त्या आरक्षणाला ५० टक्क्यांच्या मर्यादेपासून संरक्षण दिले. मराठा आरक्षणाला सुद्धा असेच  घटनात्मक संरक्षण द्यावे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :मराठा आरक्षणअशोक चव्हाण