Maratha Reservation : मराठा समाज आक्रमक, मुंबईतील 'या' 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन

By सायली शिर्के | Published: September 20, 2020 01:03 PM2020-09-20T13:03:57+5:302020-09-20T13:21:42+5:30

मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी (२० सप्टेंबर) जवळपास १८ ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

Maratha Kranti Morcha protests at 18 places in Mumbai on Supreme Court's stay order | Maratha Reservation : मराठा समाज आक्रमक, मुंबईतील 'या' 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन

Maratha Reservation : मराठा समाज आक्रमक, मुंबईतील 'या' 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन

googlenewsNext

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईमध्येमराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी (२० सप्टेंबर) जवळपास १८ ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व नियमांचं पालन करून मुंबईत ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. मुंबई लगतच्या शहरांमध्ये देखील एकाचवेळी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. 

मराठा बांधवांनी आपापल्या विभागातील ठरलेल्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला हजेरी लावण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा, महामुंबई यांच्यातर्फे करण्यात आले होते. त्यानंतर आता ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. 'शिवसेना आतापर्यंत आंदोलन करुनच मोठी झाली आहे. मग आम्ही आंदोलन करतोय तर त्याला आक्षेप का?' असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. 

मुंबईतील 'या' 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन

१. प्लाझा सिनेमा,दादर (प)
२. भारतमाता टॉकीज, लालबाग
३. शिवाजीराजे पुतळा, पांजरपोळ, चेंबूर
४. वरळी नाका, वरळी 
५. गिरगाव चर्च, गिरगाव
६. कला नगर जंक्शन, बांद्रा (पू)
७. शिवस्मारक, विमानतळ, पश्चिम दृतगती, मार्ग, विलेपार्ले(पू)
८.  जोगेश्वरी रेल्वे स्थानक (पू) 


९. शाम नगर तलाव, जोगेश्वरी (पू)
१०. दहिसर रेल्वे स्थानक (पू/प)
११. शिवाजी चौक, बरकत नाका, वडाळा (पू)
१२. संगमेश्वर मंदिर, कुर्ला (प)
१३. साईबाबा मंदिर, मानखुर्द (प)
१४. मराठी विद्यालय, पंतनगर, घाटकोपर (पू)
१५. गणेश मंदिर, भटवाडी, घाटकोपर (प)
१६. शिवाजी महाराज पुतळा, कन्नमवार नगर-२, विक्रोळी(पू)
१७. आयआयटी गेट समोर, पवई
१८. शिवाजी तलाव, भांडुप (प)

सर्वांच्या सोबतीने लढाई जिंकू - मुख्यमंत्री 

मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. सगळ्यांना विश्वासात घेऊ, विरोधी पक्ष नेत्यांशी या विषयावर बोलण्यात येईल. सरकार सुरुवातीपासून याबाबत प्रामाणिक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

"मोदी सरकारचे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे, ...मात्र एकही उत्तर नाही", काँग्रेसचा हल्लाबोल

धक्कादायक! कैद्याच्या शरीरात सापडले 4 फोन, प्रशासनात खळबळ

CoronaVirus News : आयोडीनमुळे फक्त 15 सेकंदात कोरोना होणार नष्ट?; रिसर्चमधून 'मोठा' खुलासा

कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाच्या संकटात 'या' शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी घरासमोरच आणली 'शाळा'

CoronaVirus News : आनंदाची बातमी! प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा

Web Title: Maratha Kranti Morcha protests at 18 places in Mumbai on Supreme Court's stay order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.