मराठा मोर्चा : वॉररूमचे नेटकरी झाले ‘मोर्चे’करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 04:24 AM2017-08-10T04:24:52+5:302017-08-10T04:24:52+5:30
मराठा मोर्चादरम्यान कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि समन्वयकांमध्ये ताळमेळ असावा म्हणून शिवाजी नाट्यमंदिर येथील राजर्षी शाहू महाराज सभागृहात ‘वॉर रूम’ तयार करण्यात आली होती. विशेष म्हणजे, वॉर रूममधील २५ तरुण नेटकºयांच्या टीमनेही मोर्चात सहभाग नोंदविला.
अक्षय चोरगे
मुंबई : मराठा मोर्चादरम्यान कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि समन्वयकांमध्ये ताळमेळ असावा म्हणून शिवाजी नाट्यमंदिर येथील राजर्षी शाहू महाराज सभागृहात ‘वॉर रूम’ तयार करण्यात आली होती. विशेष म्हणजे, वॉर रूममधील २५ तरुण नेटकºयांच्या टीमनेही मोर्चात सहभाग नोंदविला. टीमने मोर्चाच्या दिवशी संपूर्ण अपडेट लाइव्ह ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या संकेतस्थळावर दिले. त्याशिवाय फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअॅप ग्रुपवर अपडेट देण्यातही ही टीम कार्यरत होती.
मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबईसह राज्यातून आणि राज्याबाहेरूनही मराठा बांधवांचे वादळ मुंबईत धडकले. वाहतुकीचे मार्ग, मोर्चाचा मार्ग, पार्किंगची व्यवस्था, पाण्याची तसेच नाश्त्याची व्यवस्था कुठे केली आहे? याबाबत मोर्चेकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी वॉर रूम तयार केली होती. ही जबाबदारी सांभाळत येथील टीमने मोर्चामध्ये सहभाग घेतला. फोटो, व्हिडीओ२२, माहिती, भाषणांबाबतची सर्व माहिती या टीमने सोशल मीडियाद्वारे लाखो लोकांपर्यंत पोहोचवली. मोर्चामधील भाषणे आणि इतर अनेक पैलू फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दाखविले. नेटकºयांसोबत इतर मोर्चेकरीही आपआपल्या मोबाइलने फोटो घेत होते. त्यांच्या व्हॉट्सअॅप गु्रपवर पोस्ट करत होते. अनेक जण या मोर्चादरम्यान फेसबुकवर लाइव्ह होते.