Join us

मराठा, मुस्लीमांच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब

By admin | Published: June 25, 2014 7:46 PM

नोक-या आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला १६ टक्के, तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्तावावर आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

ऑनलाइन टीम 
मुंबई , दि. २५ - नोक-या आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला १६ टक्के, तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्तावावर आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. 
राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात उद्योगमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच मराठा आरक्षणाची घोषणा करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  राणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने मराठा समाजाला २० टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. परंतू आजच्या बैठकीत १६ टक्के आरक्षणावर मंत्रीमंडळाने मंजूरी दिली. 
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या विद्यमान आरक्षण टक्केवारीला धक्का लावला जाणार नाही, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. मराठा समाजाची लोकसंख्या, नोक-या आणि शिक्षणामधील या समाजाचे मागासलेपण, आर्थिक परिस्थिती आदी निकषांचा उपयोग करून आपल्या समितीने २० टक्के आरक्षणाची शिफारस केल्याचे राणे यांनी सांगितले होते. समाजाची लोकसंख्या राज्यात ३२ टक्के असल्याचा निष्कर्ष समितीने नोंदविला होता.