Join us

Maratha Reservation: अशोक चव्हाणांनी प्रायश्चित घ्यावं आणि राजीनामा द्यावा- प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 11:37 IST

Maratha Reservation: सुप्रीम कोर्टानं आज मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे. यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे.

Maratha Reservation: सुप्रीम कोर्टानं आज मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे. यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालावरुन भाजपनं राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावरुन राज्याचे मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.

Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

अशोक चव्हाण यांनी आजच्या निकालानंतर प्रायश्चित घ्यावं आणि राज्य सरकारनं मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं, अशी टीका दरेकर यांनी केली आहे. यासोबतच अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

उद्रेक हा शब्दही काढू नका! कोरोनामुळे संयम ठेवा; संभाजीराजेंचे मराठा समाजाला आवाहन 

"मराठा समाजासाठी आजचा दिवस अतिशय दुर्दैवी असून राज्य सरकारच्य निष्काळजीपणामुळे आजचा निकाल लागला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संपूर्ण तयारी करुन दिली होती. पण त्यावर राज्य सरकारनं योग्य पाठपुरवा केला नाही. अशोक चव्हाण यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा", असं प्रवीण दरेकर म्हणाले.  

टॅग्स :प्रवीण दरेकरमराठा आरक्षण