29 नोव्हेंबरला दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मांडणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 03:51 PM2018-11-26T15:51:30+5:302018-11-26T16:09:52+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणासंदर्भात एक विधेयक मांडणार आहेत.

Maratha reservation bill will be presented in both the Houses on 29th November by Chief Minister | 29 नोव्हेंबरला दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मांडणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

29 नोव्हेंबरला दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मांडणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणासंदर्भात एक विधेयक मांडणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29 नोव्हेंबरला दोन्ही सभागृहात विधेयक मांडणार कायदेतज्ज्ञ आणि अधिकारी विधेयक तयार करत आहेत.

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमराठा आरक्षणासंदर्भात एक विधेयक मांडणार आहेत. या विधेयकाच्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29 नोव्हेंबरला दोन्ही सभागृहात विधेयक मांडणार असल्याचं जाहीर केलं आहे. कायदेतज्ज्ञ आणि अधिकारी विधेयक तयार करत आहेत. मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक दोन्ही सभागृहात मांडणार, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. कलम 9 आणि 11 अन्वये सरकारला अॅक्शन टेकन रिपोर्ट देणं बंधनकारक आहे. त्यानंतर कलम 15नुसार हा अहवाल सभागृहात सादर करण्यात येणार आहे. विधेयक सभागृहात मांडून त्याला सर्वपक्षीयांची सहमती मिळाल्यानंतर ते मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवलं जाणार आहे. राज्यपालांनी या विधेयकावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मराठा आरक्षणाच्या विधेयकाला कायदाचं स्वरूप प्राप्त होणार असून, मराठा आरक्षण कायद्यानुसार लागू होणार आहे. 

तसेच गेल्या काही वेळापूर्वी सभागृहात मुस्लिम आरक्षणावरूनही गदारोळ झाला होता. मुस्लिम आरक्षणासंदर्भात बोलताना मालेगाव मध्यचे आमदार शेख आसिफ शेख रशिद यांनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. अद्याप मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात आलं नाही, याबाबत सरकार काहीच का बोलत नाही, असा प्रश्न आमदार शेख रशिद यांनी विधानसभेत विचारला होता. त्यावर, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देताना, धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नसल्याचं स्पष्ट केलं.

उच्च न्यायालयाने आरक्षणाला परवानगी नाही, तर मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर निर्णय झालाच नाही. तसेच, याला आम्ही स्थगिती देत नाही, याचा अर्थ केस संपली नसून ती केस अजून चालायची आहे. आंध्र प्रदेश सरकारने आणि केरळ सरकारने याआधी धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण, तो टिकला नाही. कारण, संविधानामध्ये मुस्लीम समाजात जेवढ्या जाती आहेत, त्या सर्व जाती ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी रशिद शेख यांच्या उत्तरादाखल सांगितले.

तसेच अजून जर काही जाती ओबीसीमध्ये घालायच्या असतील, तर आम्ही मागास आयोगाकडे त्यासंदर्भात निवेदन देऊ. तसेच मागासवर्गीस आयोगाला या समाजाचा अभ्यास करुन त्यांचा ओबीसी वर्गात समावेश करण्याची मागणी करू, असेही पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, कुठल्याही राज्यामध्ये प्रामुख्याने धर्माच्या आधारावर दिलेलं आरक्षण टिकलं नाही, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी धर्माच्या आधारावर मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं.

Web Title: Maratha reservation bill will be presented in both the Houses on 29th November by Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.