मुंबई - मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानंतर आरक्षणासंदर्भात विधिमंडळात सादर करण्यात येणाऱ्या विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजपाने हालचाली सुरू केल्या असून, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना आरक्षणाला पाठिंबा मिलावा यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, आरक्षणाच्या प्रश्नावर उद्या विधिमंडळात विधेयक मांडण्यात येणाऱ्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेने आपल्या आमदारांना व्हिप बजावला आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 10:57 PM