मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे वणव्यात रूपांतर होईल, दरेकर यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 08:40 AM2021-06-28T08:40:46+5:302021-06-28T08:41:11+5:30
शिवसंग्राम सेनेचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे आहे. याअंतर्गत रविवारी सायन ते सीएसएमटी अशी दुचाकी रॅली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यभरात रान पेटले आहे. आंदोलने झाली, लोक रस्त्यावर उतरले. सरकार मात्र मलिदा खाण्यात व्यस्त आहे. मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका, मराठा समाजाच्या चिंगारीचा वणवा पेटायला वेळ लागणार नाही. वणवा पेटण्याआधी मुख्यमंत्र्यांनी जागे व्हावे, असा इशारा विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर यांनी दिला.
शिवसंग्राम सेनेचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे आहे. याअंतर्गत रविवारी सायन ते सीएसएमटी अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर तसेच कार्यकर्ते व मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘कोणताही संवाद नाही’
nदरेकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचा मराठा आरक्षणाबाबत टाईमपास सुरू आहे. संघर्ष नको संवाद साधा, असे सांगणाऱ्या सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही संवाद साधला जात नसून, त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात काहीही देणेघेणे नाही.
nठाकरे सरकारने याप्रकरणी भाजप, केंद्र सरकार, फडणवीस यांच्यावर आरोप करण्यापेक्षा या अधिवेशनात मराठा समजाला न्याय देण्यासाठी प्रत्यक्षात एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे, असे दरेकर म्हणाले.