मराठा तरुणांच्या सहकारी बँक कर्जासही आता मिळणार शासनहमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 05:02 AM2019-03-06T05:02:49+5:302019-03-06T05:03:12+5:30

लहान उद्योग सुरू करण्यासाठी मराठा समाजाच्या तरुणांना देण्यात येत असलेल्या १० लाख रुपयांच्या कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांबरोबरच सहकारी बँकांनाही शासन हमी देणार आहे.

Maratha youth co-operative bank will get loan now | मराठा तरुणांच्या सहकारी बँक कर्जासही आता मिळणार शासनहमी

मराठा तरुणांच्या सहकारी बँक कर्जासही आता मिळणार शासनहमी

googlenewsNext

मुंबई : लहान उद्योग सुरू करण्यासाठी मराठा समाजाच्या तरुणांना देण्यात येत असलेल्या १० लाख रुपयांच्या कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांबरोबरच सहकारी बँकांनाही शासन हमी देणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या बाबतचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती उपसमितीचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली.
ही योजना सुरू करण्यात आली तेव्हा तिची गती फारच कमी होती पण आता २८०० तरुणांनी त्यासाठी कर्ज घेतले आहे आणि ५४ हजार तरुणांनी त्यासाठीची तयारी दर्शविली आहे. येत्या तीन महिन्यांत १५ हजार तरुणांना कर्जवाटप केले जाईल, असे पाटील म्हणाले.
मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत १६ टक्के आरक्षण राज्य शासनाने दिलेले आहे. त्या अंतर्गत पदभरतीसाठीच्या प्रक्रियेला न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. केवळ नियुक्तीपत्र देण्यास तूर्त मनाई केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर न्यायालयांमध्ये दररोज सुरू असलेली सुनावणी लक्षात घेता येत्या मे पर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे, असे पाटील म्हणाले.
मराठा समाजातील मुलामुलींना युपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी आर्थिक पाठबळ शासन देणार आहे. त्या अंतर्गत २२५ मुलामुलींचा दिल्लीत राहण्याचा
व जेवणाचा खर्च, १३ हजार
रुपये विद्यावेतन आदी दिले जाणार आहे.

Web Title: Maratha youth co-operative bank will get loan now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.