Join us

मराठी नाटकाचा मराठमोळा बाणा...!

By admin | Published: October 13, 2016 4:25 AM

मराठी नाटकांना इंग्रजी शीर्षके बहाल करून धन्यता मानण्याच्या काळात नाट्यसृष्टीत एक अपवादात्मक घटना घडली आहे. मूळ ‘ओ वुमनिया’ असे शीर्षक घेऊन

राज चिंचणकर / मुंबईमराठी नाटकांना इंग्रजी शीर्षके बहाल करून धन्यता मानण्याच्या काळात नाट्यसृष्टीत एक अपवादात्मक घटना घडली आहे. मूळ ‘ओ वुमनिया’ असे शीर्षक घेऊन मराठी रंगभूमीवर काही प्रयोग रंगवलेल्या नाटकाने आता यू-टर्न घेत, मराठी नामकरण केले आहे. ‘अ आईचा, ब बाईचा’ या शीर्षकाने आता या नाटकाचे प्रयोग रंगू लागले आहेत. यानिमित्ताने या नाटकाने मराठमोळा बाणा जपला आहे.‘ओ वुमनिया’ हे नाटक काही महिन्यांपूर्वी रंगभूमीवर आले आणि त्याचे रीतसर प्रयोगही सुरू झाले, पण अलीकडेच या नाटकाचे निर्माते गोपाळ अलगेरी यांनी या नाटकाचे थेट मराठी नामकरण करून प्रयोग सुरू केले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, स्वाती चिटणीस, जयंत सावरकर, सतीश पुळेकर, कादंबरी कदम अशी अभिनयाची तगडी फौज असलेले हे नाटक, आता मराठमोळ्या नावाने रंगभूमीवर घौडदौड करू लागले आहे. उशिराने का होईना, परंतु या नाटकाच्या इंग्रजी नावावर पडदा पडून, या नाटकाने स्वीकारलेल्या मराठी शीर्षकाचे नाट्यसृष्टीत स्वागत होत असल्याचे चित्र आहे.